रात्री १२ नंतर शहरातील रस्त्यावर फिरतात तरी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:36 AM2021-09-23T04:36:25+5:302021-09-23T04:36:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या निर्बंधामुळे रत्नागिरी शहरातील जनजीवन बदलले असून, पूर्वीप्रमाणे रात्री १० नंतर जागी असलेली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या निर्बंधामुळे रत्नागिरी शहरातील जनजीवन बदलले असून, पूर्वीप्रमाणे रात्री १० नंतर जागी असलेली बाजारपेठ आता ८ वाजताच शांत होऊ लागली आहे. त्यामुळे रात्री ११ नंतर शहरात येणाऱ्या प्रवाशांना जेवणाची सोय होणे हल्ली मुश्कील झाले आहे. पहाटेची खासगी वाहतूकही आता कमी झाल्याने रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे लवकर सुरू होणाऱ्या चहाच्या गाड्यांचे प्रमाणदेखील कमी झाले आहे.
कोरोनाच्या काळात पोलिसांनी शहर आणि परिसरातील गस्त वाढविली आहे. त्यामध्ये भाट्ये, मांडवी, कारवांचीवाडी, परटवणे या भागात ती अधिक दिसून येत आहे.
मंगळवारी रात्री शहरातून केलेला हा रिॲलिटी चेक आहे. यामध्ये पोलीस साळवी स्टाॅप येथे येणाऱ्या प्रत्येक दुचाकी व चारचाकी वाहनांची कसून तपासणी करीत होते.
.............
पोलिसांची गस्त म्हणून आपली झोप मस्त
दररोज रात्री पोलिसांकडून गस्त घातली जाते. या गस्तीमध्ये पाेलिसांकडून शहरातील एका ठिकाणी अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये कोणी फरार किंवा पाहिजे आरोपी मिळतो याची खात्री केली गेली.
शहरातील मध्यवर्ती असलेले बसस्थानक, याठिकाणी अचानकपणे जाऊन पाहणी केली. याठिकाणी अनोळखी कोणी आहे का, याची खात्री केली.
रिकामटेकड्यांची संख्या कमी
जेटी १.३५
शहरातील मिरकरवाडा जेटी येथे जाऊन तिथे कुठच्याही प्रकाराची अनोळखी बोट आलेली नाही याची पाहणी केली.
रेल्वेस्टेशन २.१५
रेल्वेस्थानक या ठिकाणी जाऊन तीन प्रवासी भेटले. या प्रवाशांकडे चौकशी केली तर ते प्रवासी कोकणकन्याने मडगावला जाणार होते. त्यासाठी ते रेल्वेस्थानकात आले होते.
...............................
गस्त घालणाऱ्या पोलीस अंमलदारांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. संशयित व्यक्ती जर कोणी फिरताना आढळून आली, तर अशांची चौकशी करणे. ज्या ठिकाणी बँक, एटीएम आहेत अशा ठिकाणी गस्त घातली जाते. गस्तीच्या वेळी दुचाकी व चारचाकी वाहने आढळली तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
- सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी