पुरे बुद्रुक, देवघरमधील घरांचा प्रश्न जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:34 AM2021-08-19T04:34:14+5:302021-08-19T04:34:14+5:30

खेड : तालुक्यातील पुरे बुद्रुक, देवघर येथील आदिवासी वाड्यांमधील घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील ग्रामस्थांनी आमदार योगेश कदम ...

The whole Budruk was like the question of houses in the temple | पुरे बुद्रुक, देवघरमधील घरांचा प्रश्न जैसे थे

पुरे बुद्रुक, देवघरमधील घरांचा प्रश्न जैसे थे

googlenewsNext

खेड : तालुक्यातील पुरे बुद्रुक, देवघर येथील आदिवासी वाड्यांमधील घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील ग्रामस्थांनी आमदार योगेश कदम यांची भेट घेऊन व्यथा मांडल्यानंतर कदम यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

सरपंच तसेच ग्रामस्थांनी घरकुल योजना, नळपाणी योजना, रस्त्याचे प्रश्न आमदार कदम यांच्याकडे मांडले. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या लोकांना तातडीच्या मदतीबरोबरच सार्वजनिक मालमत्ता दुरुस्ती तसेच रस्ते, नळपाणी योजना, स्मशानशेड दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पुरे बुद्रुक, किंजळे तर्फ नातू नदीवरील मंजूर पुलाच्या कामाची निविदा काढून काम सुरू करण्यासही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.

यावेळी विभागप्रमुख श्रीकांत शिर्के, राजेंद्र शेलार, सुरेश कदम, रवींद्र मोरे, सुनील खोत, रघुनाथ शेलार, सखाराम गायकवाड, मोहन निकम, प्रकाश पवार, रवींद्र कदम, माधवी महाडिक, महेश जाधव, किशोर सणस, प्रकाश जंगम, सुगंधा जंगम, हरिश्चंद्र निकम, वैशाली पिंपळकर, गजानन मोरे, तालुकाप्रमुख विजय जाधव, सुप्रिया पवार, शशिकांत चव्हाण, अरूण कदम, शाम मोरे, भरत महाडिक, अशोक जाधव, नामदेव सोंडकर उपस्थित होते.

Web Title: The whole Budruk was like the question of houses in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.