‘व्हॉटसअ‍ॅप’ने आणले माजी विद्यार्थ्यांना एकत्र

By admin | Published: September 10, 2014 10:36 PM2014-09-10T22:36:17+5:302014-09-11T00:10:26+5:30

शहरातील फाटक हायस्कूलमधील १९९२च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी एकत्र आले. एवढेच नव्हे तर त्यांचे स्नेहसंमेलनही साजरे

'Whotswap' brings together former students | ‘व्हॉटसअ‍ॅप’ने आणले माजी विद्यार्थ्यांना एकत्र

‘व्हॉटसअ‍ॅप’ने आणले माजी विद्यार्थ्यांना एकत्र

Next

रत्नागिरी : सोशल मीडियामुळे समाज जवळ येत आहे. अशा मीडियामुळे एकीकडे जुुने शाळकरी मित्र एकमेकापासून दुरावत असल्याची टीका होत असताना व्हॉटस्अ‍ॅपसारख्या माध्यमातून शहरातील फाटक हायस्कूलमधील १९९२च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी एकत्र आले. एवढेच नव्हे तर त्यांचे स्नेहसंमेलनही साजरे झाले.
अनेक मोबाईलस्वर सध्या व्हॉटसअ‍ॅप झळकू लागले आहे. या व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून फाटक हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचा चंग बांधला. १९९२मध्ये फाटक प्रशालेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन साजरे करण्याचा निर्णय घेतला. व्हॉटसअ‍ॅपवर या विद्यार्थ्यांचा ग्रुपही तयार झाला. जे व्हॉटस्अ‍ॅपवर नाहीत, त्यांच्याशी हळूहळू संपर्क सुरु झाला आणि त्यातूनच माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यासाठी माजी शिक्षकांनाही पाचारण करण्यात आले होते. समाजात विविध स्तरावर कार्य करणाऱ्या व उच्च पदस्थ माजी विद्यार्थ्यांचा यावेळी माजी शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे माजी शिक्षकांनीही कौतुक केले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी ओंकार फडके, मिलिंद पाटील, मोहिंदर बामणे, अमोल निवळकर आदींनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Whotswap' brings together former students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.