पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप
By admin | Published: February 3, 2017 01:04 AM2017-02-03T01:04:13+5:302017-02-03T01:04:13+5:30
पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप
रत्नागिरी : खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे पत्नीवर विळ्याने व दांडक्याने प्रहार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. डिगे यांनी दोषी ठरविले. नंदकिशोर शिवराम चौहान (वय ३५, रा. खालगाव-जाकादेवी) असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
नंदकिशोर चौहान हा सुशील देसाई यांच्या खालगाव येथील आंबा बागेत राखणदार म्हणून कामाला होता. तो या बागेतच पत्नी जगराना चौहानसोबत राहत होता. अन्य नेपाळीही तेथे कामासाठी होते. ३० एप्रिल २०१६ ला या बागेत काम करणारे अन्य कामगार बाजारपेठेत गेले होते. नंदकिशोर जगरानाकडे खर्चासाठी पैसे मागत होता; परंतु तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. नंदकिशोरचा राग अनावर झाला व त्याने जगरानावर लाकडी दांडका व लोखंडी विळ्याने प्रहार करण्यास सुरुवात केली. बसलेल्या नंदकिशोरला ताब्यात घेतले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. डिगे यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे याप्रकरणी नऊ साक्षीदार तपासण्यात आले. गुरुवारी या खटल्याचा निकाल सुनावण्यात आले. सरकारी पक्षाचे पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने नंदकिशोर चौहानला भादंविक ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. (वार्ताहर)