जुन्या पेन्शनसाठी समिती नेमणार : मुख्यमंत्री शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 11:28 AM2023-02-18T11:28:31+5:302023-02-18T11:28:57+5:30

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा शुक्रवारी रत्नागिरीत झाला.

Will appoint a committee for old pension: Chief Minister Shinde | जुन्या पेन्शनसाठी समिती नेमणार : मुख्यमंत्री शिंदे

जुन्या पेन्शनसाठी समिती नेमणार : मुख्यमंत्री शिंदे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच राज्यस्तरावर एक समिती नेमण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या येथील राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये केली. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठीही राज्यस्तरावर समिती नेमली जाईल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा शुक्रवारी रत्नागिरीत झाला. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मेळाव्याचे स्वागताध्यक्ष उदय सामंत, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, संघटनेचे नेते संभाजीराव थोरात आदी उपस्थित होते.
 मुख्यमंत्री म्हणाले, स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. मात्र, तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात बदल आहे. अर्थात तंत्रज्ञान कितीही बदलले तरी शिक्षक - विद्यार्थी यांच्यातील नाते कधीही बदलू शकणार नाही.

Web Title: Will appoint a committee for old pension: Chief Minister Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.