किमान वेतन लागू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार, मंत्री सामंतांचे कंत्राटी वाहन चालकांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 07:50 PM2022-11-07T19:50:26+5:302022-11-07T19:50:56+5:30

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिकांवर ६७ कंत्राटी चालक म्हणून गेली १८ वर्षे अखंडित सेवा करीत आहेत.

Will discuss implementation of minimum wage with Health Minister, Minister Samant assurance to contract drivers | किमान वेतन लागू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार, मंत्री सामंतांचे कंत्राटी वाहन चालकांना आश्वासन

संग्रहित फोटो

Next

रत्नागिरी : ‘समान काम, समान वेतन’ या न्याय्य तत्त्वानुसार कंत्राटी वाहनचालकांचे मूळ वेतन १९,९०० असून, ते वाहन चालकांना लागू करण्याबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कंत्राटी वाहनचालकांना राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या भेटीत दिले.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिकांवर ६७ कंत्राटी चालक म्हणून गेली १८ वर्षे अखंडित सेवा करीत आहेत. जिल्ह्यातील रुग्णवाहिकांवर नेमलेल्या या कत्राटी चालकांना ठेकेदाराकडून १३ हजार ४४८ रुपये इतके मानधन देण्यात येते. किमान वेतन कायद्यानुसार वेळोवेळी वाढ करण्यात येणाऱ्या भत्त्यानुसार चालकांना मानधन अदा करणे सेवापुरवठादाराला बंधनकारक होते. मात्र, या चालकांना किमान वेतनतत्त्वानुसार मानधन अदा करण्यात येत नाही. किमान वेतनानुसार १९,९०० इतके मानधन मिळणे आवश्यक आहे.

मानधन कमी देण्यात येत असून, तेही वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटी वाहनचालकांचे हाल सुरू आहेत. सणासुदीलाही त्यांना मानधन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत. याबाबत अनेकदा जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये जोरदार चर्चाही झाल्या आहेत. शिवाय कंत्राटदारालाही तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही त्यांना वेळेवेर मानधन तर मिळतच नाही. शिवाय शासनाच्या किमान वेतनानुसार ते देणे आवश्यक आहे. याबाबत पालकमंत्री सामंत यांची वाहनचालकांनी भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून १९,९०० मानधन मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

Web Title: Will discuss implementation of minimum wage with Health Minister, Minister Samant assurance to contract drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.