रेल्वे स्थानक अस्वच्छ करण्याचा डाव उधळणार ?

By Admin | Published: March 9, 2015 09:28 PM2015-03-09T21:28:07+5:302015-03-09T23:55:30+5:30

स्वच्छतेची ऐशीतैशी : प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया

Will the railway station to be defiled? | रेल्वे स्थानक अस्वच्छ करण्याचा डाव उधळणार ?

रेल्वे स्थानक अस्वच्छ करण्याचा डाव उधळणार ?

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्थानक अस्वच्छ करण्याचा विडाच कोकण रेल्वे व्यवस्थापनाने उचलला असून, स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर २लगतचा ट्रॅक खडीयुक्त बनवण्यासाठी सिमेंट ट्रॅक खणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या ट्रॅकवर रेल्वेगाड्यांच्या टॉयलेटसमधील सांडलेली घाण स्वच्छ करता येणार नाही व हे स्थानक घाणीचे केंद्र बनणार आहे. त्यामुळे खडीयुक्त ट्रॅकला नागरिकांचा विरोध होत असून, त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रत्नागिरी स्थानकात सर्वच रेल्वे गाड्या थांबत असल्याने ट्रॅकवर गाड्यांमधील घाण पडते. मात्र, सिमेंट बेस असल्याने पाण्याद्वारे या घाणीची साफसफाई करता येते. परंतुु खडीयुक्त ट्रॅकमुळे मात्र ही सफाई करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पुन्हा येथे सिमेंट बेस असलेलेच ट्रॅक उभारावेत, अशी प्रवाशांची मागणी आहे. हे दोन्ही ट्रॅक खडीयुक्त केले तर येत्या काही महिन्यात प्लॅटफॉर्मवर उभे राहणेही प्रवाशांना कठीण होणार आहे. त्यामुळेच प्रवाशांचा या बदलास विरोध होत असून, सिमेंटबेसयुक्त अर्थात ब्लास्टलेस ट्रॅकची मागणी होत आहे. तसे न झाल्यास कोकण रेल्वेला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असून, नजीकच्या काळात आंदोलनाचा पवित्राही घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)


शिवसेनेने लक्ष घालावे
रत्नागिरीसारख्या महत्त्वाच्या व रत्नागिरीची शान असलेल्या स्थानकावर घाणीचे साम्राज्य निर्माण होणार असल्याने हा प्रकार रोखण्यासाठी शिवसेनेने या प्रकरणी लक्ष घालावे. रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांचा हा हट्ट, दुराग्रह हाणून पाडावा, अशी मागणीही प्रवाशांतून होत आहे.

Web Title: Will the railway station to be defiled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.