अखेर २० खाड्यांमधील गाळ उपसा करणार?, चेंडू आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:58 PM2020-10-10T13:58:16+5:302020-10-10T13:59:36+5:30

Mirkarwada Bandar, ratnagirinews, वर्षानुवर्षे समुद्राच्या खाड्यांमधील गाळ उपसा न झाल्याने या खाड्या धोकादायक बनल्या आहेत. या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौका अपघातग्रस्त होत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर केला आहे. त्यामुळे आता लवकरच या खाड्यांमधील गाळ उपसा होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Will the sludge be removed from 20 creeks in the end? The ball goes to the commissioner | अखेर २० खाड्यांमधील गाळ उपसा करणार?, चेंडू आयुक्तांकडे

अखेर २० खाड्यांमधील गाळ उपसा करणार?, चेंडू आयुक्तांकडे

Next
ठळक मुद्देसहाय्यक मत्स्य संचालक विभागाचा प्रस्ताव दापोली तालुक्यात सर्वाधिक गरज

रत्नागिरी : वर्षानुवर्षे समुद्राच्या खाड्यांमधील गाळ उपसा न झाल्याने या खाड्या धोकादायक बनल्या आहेत. या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौका अपघातग्रस्त होत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर केला आहे. त्यामुळे आता लवकरच या खाड्यांमधील गाळ उपसा होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असल्याने खाड्यांचे प्रमाणही मोठे आहे. या खाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. त्यामुळे मच्छिमारांचा उदरनिर्वाह यावर होत असतो. मात्र, वर्षानुवर्षे या खाड्यांमध्ये साचलेला गाळ अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे खाड्यांच्या मुखाशी असलेल्या या गाळांमध्ये अनेक नौका अडकून दुर्घटनाग्रस्त झाल्या आहेत. त्यात अनेकांचा बळीही गेला आहे.

या दुर्घटना रोखण्यासाठी येथील येथील सहाय्यक मत्स्य संचालक विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ उपसा व्हावा, यासाठी मत्स्य आयुक्त अतुल पटणे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठीचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ उपसा करण्यासाठी विस्तृत आराखडाही तयार करण्यात आला आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्त नागनाथ भादुले, अधिकारी संतोष देसाई, परवाना अधिकारी रश्मी आंबुलकर यांनी मत्स्य आयुक्त अतुल पटणे, प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार केला आहे. येत्या अधिवेशनात हा आराखडा सादर करण्यात येणार आहे. प्रत्येक खाडीसाठी १ कोटी रुपये असा २० कोटी रुपयांचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

या खाड्यांमध्ये काम

साखरीनाटे, हर्णै, बाणकोट, केळशी, सालदुरे, अडखळ, आंजर्ले, मिरकरवाडा, मांडवी, काळबादेवी, गोळप, पालशेत, आडे - उटंबर, तुळसुंदे, दाभोळखाडी, चिंचबंदर, पडवे, पूर्णगड, जैतापूर, जयगड.

 

Web Title: Will the sludge be removed from 20 creeks in the end? The ball goes to the commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.