पहिलीसाठी विद्यार्थ्याचे वय कमी होणार?

By admin | Published: October 26, 2014 09:10 PM2014-10-26T21:10:38+5:302014-10-26T23:25:19+5:30

किमान पाच वर्ष अकरा महिने ठेवण्याचा निर्णय विचाराधीन

Will the student be reduced for the first time? | पहिलीसाठी विद्यार्थ्याचे वय कमी होणार?

पहिलीसाठी विद्यार्थ्याचे वय कमी होणार?

Next

रत्नागिरी : पहिलीमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश देताना वयाची अट किमान पाच वर्ष अकरा महिने ठेवण्याचा निर्णय विचाराधीन आहे. नवीन शैक्षणिक वर्षात जूनमध्ये प्रवेश देण्यासाठी नवीन अटीची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या शासनाकडून त्यास मान्यता देण्यात येणार आहे.पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाची अट निश्चित करण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे विविध स्तरावरून संशोधन करण्यात आले होते. त्यासाठी समित्या स्थापन केल्या होत्या. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. पुणे आणि मुंबईमध्ये शिक्षण हक्क कायद्याच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेदरम्यान या प्रकारामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शालेय प्रवेशासाठी राज्यभरात एक समान धोरण असावे, म्हणून राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या एक सदस्यीय समितीला त्यावरील संभाव्य उपायांचा विचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार माने यांच्या समितीने हा अहवाल तयार केला असून सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
पहिली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे अपेक्षित वय, प्रवेशाचे वय कोणत्या तारखेला ग्राह्य धरायचे, याचाही या अहवालाच्या निर्मितीदरम्यान विचार करण्यात आला आहे. त्यानुसार ३१ जुलै रोजी ५ वर्षे ११ महिने पूर्ण करणाऱ्या बालकांनाच पहिलीला प्रवेश दिला जावा, अशा सूचना या अहवालामध्ये करण्यात आल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण हक्क कायद्यामधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाबाबतचे वेळापत्रक देखील लवकरच जाहीर केले जाणार आहे. प्राथमिक शिक्षण प्रवेशासाठी किमान साडे तीन वर्षाची अट घालण्यात आली होती. त्यामुळे पहिलीतील पाल्य ६ ते ७ वयोगटातील असे. परंतु वय कमी करण्याच्या निर्णयामुळे सर्वसाधारण पहिलीतील विद्यार्थी किमान ६ वयोगटातील असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Will the student be reduced for the first time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.