खेडमधील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचा पडदा उघडणार की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:32 PM2020-12-05T17:32:17+5:302020-12-05T17:34:39+5:30

Natak, Khed, Coronavirus Unlock, Ratnagiri खेड तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळीचे एकमेव साक्षीदार असलेले स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह गेली १२ वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. या १२ वर्षात नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु, या नाट्यगृहाचा पडदा अद्याप उघडला नसल्याने बंद पडलेले नाट्यगृह पुन्हा सुरु होणार की नाही? असा प्रश्न खेडमधील नाट्यरसिक आता विचारू लागले आहेत.

Will Thackeray open the curtain of the theater or not? | खेडमधील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचा पडदा उघडणार की नाही?

खेडमधील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचा पडदा उघडणार की नाही?

googlenewsNext
ठळक मुद्देठाकरे नाट्यगृहाचा पडदा उघडणार की नाही?खेडच्या नाट्यरसिकांची नगर प्रशासनाकडे विचारणा

खेड : तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळीचे एकमेव साक्षीदार असलेले स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह गेली १२ वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. या १२ वर्षात नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु, या नाट्यगृहाचा पडदा अद्याप उघडला नसल्याने बंद पडलेले नाट्यगृह पुन्हा सुरु होणार की नाही? असा प्रश्न खेडमधील नाट्यरसिक आता विचारू लागले आहेत.

नगर परिषदेने १९९६ साली शहरामध्ये सुसज्ज नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला. तत्कालिन नगरविकास मंत्री सुनील तटकरे यांच्या माध्यमातून आवश्यक असलेला पावणेदोन कोटींचा निधी उपलब्ध होताच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत नाट्यगृहाची दिमाखदार इमारत उभी राहिली. २००१ साली नाट्यगृहाचे मीनाताई ठाकरे असे नामकरण करून ही वास्तू नाट्यरसिकांच्या सेवेत रुजू झाली.

या आठ वर्षात नाट्यरसिकांना या नाट्यगृहात अनेक दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेता आला. ज्येष्ठ रंगकर्मी स्व. डॉ श्रीराम लागू, स्व. लक्ष्मीकांत बेर्डे यासारख्या दिग्गज कलाकारांचा जिवंत अभिनय अगदी जवळून अनुभवता आला. नाटकांप्रमाणेच जादुचे प्रयोग, राजकीय मेळावे, शाळा, महाविद्यालयांची स्नेहसंमेलने होऊ लागली. मात्र, २००८ साली या नाट्यगृहाला ग्रहण लागले.

एका कार्यक्रमादरम्यान नाट्यगृहाच्या व्हराड्यांत प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत एकाएकी कोसळले आणि केवळ आठ वर्षातच लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली इमारत डागडुजीला आल्यावर शिक्कामोर्तब झाले. एक-दोन वर्षात इमारतीच्या डागडुजीचे काम पूर्ण होईल आणि नाट्यगृहाचा पडदा पुन्हा एकदा उघडेल, असे अपेक्षित होते. मात्र, तब्बल १२ वर्षे उलटली तरीही नाट्यगृह रसिकांच्या सेवेत रुजू करणे शक्य झालेले नाही.

गेल्या १२ वर्षात खेड नगर परिषदेत तीनवेळा सत्ताबदल झाले. अनेकदा नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. नाट्यगृह सुरु करण्याबाबतच्या तारख्या दिल्या गेल्या. मात्र, आजतागायत नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजलीच नाही. हे नाट्यगृह यापुढे तरी नाट्य रसिकांसाठी खुले होईल का? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

Web Title: Will Thackeray open the curtain of the theater or not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.