Ratnagiri Crime: ऑनलाइन नाेकरी देण्याच्या आमिषाने तरुणाला दाेन लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:46 PM2023-02-13T12:46:11+5:302023-02-13T12:46:50+5:30

ही रक्कम तरुणाने आई-वडिलांच्या बँक खात्यातून गुगल पेद्वारे भरली

With the lure of online jobs A young man in Devrukh was cheated of two lakhs | Ratnagiri Crime: ऑनलाइन नाेकरी देण्याच्या आमिषाने तरुणाला दाेन लाखांचा गंडा

Ratnagiri Crime: ऑनलाइन नाेकरी देण्याच्या आमिषाने तरुणाला दाेन लाखांचा गंडा

googlenewsNext

रत्नागिरी : ऑनलाइन नाेकरी देण्याच्या बहाण्याने देवरूखातील एका तरुणाला २ लाख १४ हजार ५८० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. ही रक्कम तरुणाने आई-वडिलांच्या बँक खात्यातून गुगल पेद्वारे भरली असून, हा प्रकार ७ फेब्रुवारी २०२३ ते ९ फेब्रुवारी २०२३ या कलावधीत घडला. याप्रकरणी देवरुख पाेलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फसवणुकीप्रकरणी अलाेक प्रमाेद नलावडे (देवरूख, संगमेश्वर) याने फिर्याद दिली आहे. अलाेक नलावडे हा पदवीधर असून, त्याच्या माेबाइलवर टेलिग्राम ॲपवर ‘गायत्री’ नावाचे प्राेफाईल असलेल्या व्यक्तीने संदेश पाठविला. त्या संदेशामध्ये ऑनलाइन नाेकरी देण्याच्या बहाण्याने सिनेस्तान फिल्म कंपनी प्रा. लि. या कंपनीच्या चित्रपटांना रेटिंग देण्यास कंपनीने ॲप डाऊनलाेड करण्यास सांगितले. 

त्यानंतर पैसे मिळण्यासाठी तरुणाला टास्क पूर्ण करण्यासाठी वेळाेवेळी रक्कम भरण्यास सांगितले. टास्क पूर्ण केल्यानंतर तरुणाला ६ लाख १७ हजार ४९१ रुपये मिळतील असे सांगितले. त्यावेळी अलाेकने ही रक्कम भरणे शक्य नसल्याचे सांगून भरलेली रक्कम परत करण्यास सांगितले. ही रक्कम देण्यास टाळाटाळ हाेत असल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे समाेर आले.

Web Title: With the lure of online jobs A young man in Devrukh was cheated of two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.