तक्रार अर्ज मागे न घेतल्याने महिलेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:30 AM2021-05-16T04:30:19+5:302021-05-16T04:30:19+5:30
रत्नागिरी : संवाद सोशल फाऊंडेशनच्या एका महिलेने दिलेला तक्रार अर्ज मागे न घेतल्याच्या रागातून तिला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी ...
रत्नागिरी : संवाद सोशल फाऊंडेशनच्या एका महिलेने दिलेला तक्रार अर्ज मागे न घेतल्याच्या रागातून तिला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता राजीवडा येथे घडली़. याप्रकरणी पाेलिसांनी ८ जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
संवाद साेशल फाऊंडेशनच्या एका पदाधिकारी महिलेने पाेलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. हा अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्या महिलेने हा अर्ज मागे घेतला नाही़. तसेच त्या महिलेची तक्रार मिटविण्यासाठी मदत केली नाही. शुक्रवारी ईद सणानिमित्त त्या आपल्या सासरी राजीवडा येथे गेल्या होत्या. तेव्हा संशयित त्यांच्या घराशेजारी त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे़
याप्रकरणी फैरोजा मुन्नवर म्हसकर (३८, रा. कोकणनगर) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून ताहिर मुल्ला, नाझीम मजगावकर, आफान मजगावकर, खलील मजगावकर, तसव्वुर, मिनाज खलील मजगावकर, फजीला, आसफीया मुल्ला यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुक्ता भोसले करीत आहेत.