नाणीज येथून महिलेचे दागिने लांबवले

By admin | Published: December 20, 2014 11:35 PM2014-12-20T23:35:47+5:302014-12-20T23:35:47+5:30

चोरट्याचा छडा लावण्यासाठी नाकेबंदी

The woman's jewelery removed from Nunge | नाणीज येथून महिलेचे दागिने लांबवले

नाणीज येथून महिलेचे दागिने लांबवले

Next

रत्नागिरी : टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या एका महिलेच्या सोन्याचे दागिने, मोटरसायकलवरुन आलेल्या एका अज्ञात स्वाराने लांबवल्याने पुन्हा एकदा धूमस्टाईल चोरट्यांनी डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना पालीजवळील नाणीज येथे सायंकाळी ४ वा. सुमारास घडली.
स्थानिक ग्रामस्थ आणि पाली पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी या चोरट्याचा छडा लावण्यासाठी नाकेबंदी केली मात्र हा चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला. चोरवणे येथील संध्या सुधाकर पांचाळ (३४) या नाणीज येथे टेलरिंगचा व्यवसाय करतात. आज नित्यनियमाने त्यांनी सायंकाळी ४ वा. सुमारास आपले दुकान बंद करुन आपल्या गावी चोरवणे येथे अनिषा अजय पितळे व विजया विजय सिदम या दोन महिलांसह आड मार्गाने घरी चालल्या होत्या. रस्त्याचे काही अंतर कापल्यावर एक धूम स्टाईल पल्सर मोटरसायकलवरुन तोंडाला स्कार्फ बांधून त्यांच्यापुढे गेला व पुन्हा त्याच वेगाने गाडी वळनू या महिलेच्या दिशेने आला व डोळ्याचे पाते लवते न लवते या क्षणात पांचाळ यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चैनी व एक मंगळसूत्र असे अंदाजे ५० हजार रुपयाचे दागिने लांबवले. ग्रामस्थांना ही बातमी कळल्यानंतर त्यातील काही तरुणांनी तो चोरटा ज्या दिशेने गेला, त्या कोल्हापूर रोडच्या दिशेने त्याचा पाठलाग केला मात्र तो कोठेही आढळून आला नाही. मात्र त्यानंतर ही घटना गावात कळल्यावर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात गोळा झाले व त्यांनी पाली दूरक्षेत्राशी संपर्क साधला पालीचे सहाय्यक पो. निरीक्षक प्रल्हाद पाटील, हेड कॉन्स्टेबल रमेश चव्हाण यांनी पाहणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: The woman's jewelery removed from Nunge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.