महिला वाहकाची विद्यार्थ्यांना मारहाण

By admin | Published: December 20, 2014 11:37 PM2014-12-20T23:37:41+5:302014-12-20T23:37:41+5:30

जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार; एका विद्यार्थिनीचा समावेश

Women carrier students beat | महिला वाहकाची विद्यार्थ्यांना मारहाण

महिला वाहकाची विद्यार्थ्यांना मारहाण

Next

रत्नागिरी : बस कोठे जाणार? असे विचारणाऱ्या विद्यार्थिनीसह ४-५ विद्यार्थ्यांना महिला वाहकाने मारहाण केली. त्यांना अपशब्द वापरून मारझोड केल्याप्रकरणी भगवतीनगर बसमधील महिला वाहकाला निलंबित करण्याची मागणी शनिवारी मिरकरवाडा येथील नगरसेवक व रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली़ मारहाणीची ही घटना बुधवारी घडली आहे. याप्रकरणी कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी तीन वेगवेगळ्या एसटीतून येणारी मुले शाळा सुटताना एकाच बसने जातात़ दि़ १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५़३० वाजता शहरातील आयडीयल हायस्कूल ते भगवती बसमध्ये महिला वाहक ड्युटीवर होत्या. या दिवशी इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनीने दरवाजातून चढताना त्या महिला वाहकाला ‘बस कोठे जाणार?’ असे विचारले असता त्या वाहकाने छोट्या विद्यार्थिनीच्या श्रीमुखात मारली़ यानंतर बस सुरू झाल्यानंतर चालकाने अचानक बे्रक लावल्यामुळे गाडीतील काही मुलांचा पाय त्या महिला वाहकाच्या पायावर पडला म्हणून तिने आणखी ४ ते ५ मुलांना अपशब्द वापरून मारहाण केली़ या मारहाणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी संबंधित स्त्री वाहकाला त्वरित निलंबित करा, अन्यथा उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक नुरुद्दिन पटेल, शिक्षक पालक संघाचे नजीरुद्दिन वस्ता, जमातुल मुस्लिमीन, मिरकरवाडाचे अध्यक्ष सलाऊद्दीन पटेल, पांजरी मोहल्ला अध्यक्ष बाबामियाँ मजगावकर, इक्बाल खान यांनी जिल्हाधिकारी व एस़टी़चे आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ (शहर वार्ताहर) विद्यार्थ्यांना मारहाणीची ही घटना माझ्या कानावर आली आहे. महिला वाहकाने विद्यार्थ्यांना अपशब्द वापरुन मारहाण केल्याप्रकरणी दोन्ही बाजूची चौकशी करण्यात येईल़ त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. -के.बी. देशमुख, विभाग नियंत्रक, रत्नागिरी आणखी एक घटना याच मार्गावरील सीटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाला महिला वाहकाने जातीवाचक शिवीगाळ करून कानफटात मारल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर लोकांनी एस़ टी़च्या विभागीय कार्यालयात धाव घेतली़ त्यानंतर या प्रकाराची चौकशी करण्यापूर्वीच या मार्गावरील बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या़ यामुळे संतापाची लाट उसळली असून, संबंधित महिला वाहकावर कारवाई न केल्यास सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा एस़ टी़ला दिला आहे़

Web Title: Women carrier students beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.