खेड- कालव्यातील पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 09:06 AM2018-04-07T09:06:20+5:302018-04-07T09:06:20+5:30

चासकमानच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात दुचाकी सह पती पत्नी पडून पत्नीचा पाण्यात बडून दुदैर्वी मुत्यू झाला.

women died after falling down in canal | खेड- कालव्यातील पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

खेड- कालव्यातील पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

Next

खेड- रेटवडी (ता. खेड ) येथे चासकमानच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात दुचाकी सह पती पत्नी पडून पत्नीचा पाण्यात बडून दुदैर्वी मुत्यू झाला. पतीने पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल झाला. उज्वला राजेंद्र भगत (वय३७ ) मुळ गाव निमगाव खंडोबा सध्या रा. राजगुरुनगर ( ता. खेड ) असे मृत्यूमुखी पड़लेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, (दि. ६ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पती राजेंद्र व पत्नी उज्वला हे राजगुरुनगरला चासकमानधरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरून दुचाकी वरुन जात होते. धरणांचा डाव्या कालव्याला पाण्याचे आर्वतन सुरू आहे दुचाकी घसरल्याने दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले पती राजेंद्र यांने पत्नी उज्वला हिला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्यांचा प्रवाह जास्त असल्याने पत्नी पाण्यात वाहून गेली. दरम्यान कालव्याच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने दोघेही पाण्यात वाहत गेले. राजेंद्र भगत यांनी आरओरडा केला रेटवडी येथील स्थानिक नागरिक मदतीसाठी धाऊन आले. नागरिकांच्या मदतीने राजेंद्र भगत यांना वाचविण्यात यश आले. मात्र त्यांच्या पत्नी पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून अनेक दिवसांपासुन पाण्याचा विसर्ग सुरु असुन कालवा दुथडी भरुन वाहत आहे. चासकमानच्या डाव्या कालव्याच्या दोन्ही बाजुने दळणवळणासाठी रस्ता आहे. या रस्त्यांचा वापर आजुबाजुच्या गावातील शेतकरी करत असतो. भगतवस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने अशा अडचणीचा सामना करत येथील नागरिकांचा रोजच जिवघेणा प्रवास सुरु असतो. याच जिवघेण्या प्रवासात आज एका महिलेला आपला जीव गमवावा लागला असुन अशा दुर्दैवी घटनेमुळे भगतवस्ती रेटवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे


 

Web Title: women died after falling down in canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.