महिलांनी पुढाकार घेऊन राबविली प्लास्टिकमुक्ती मोहीम

By admin | Published: October 28, 2016 11:43 PM2016-10-28T23:43:57+5:302016-10-28T23:43:57+5:30

परिसर स्वच्छतेचा नारा : स्वच्छतेकडून समृद्धीकडे; वेलदूर - नवानगर येथील श्रीराम महिला मंडळाचा आदर्शवत स्तुत्य उपक्रम

Women took the initiative and carried out the Planned Action Campaign | महिलांनी पुढाकार घेऊन राबविली प्लास्टिकमुक्ती मोहीम

महिलांनी पुढाकार घेऊन राबविली प्लास्टिकमुक्ती मोहीम

Next

असगोली : गुहागर तालुक्यातील वेलदूर - नवानगर येथील श्रीराम महिला मंडळाने नवानगर परिसरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी प्लास्टिक मुक्ती व परिसर स्वच्छतेचा नारा देण्यात आला. या उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वेलदूर - नवानगर येथील श्रीराम महिला मंडळाच्यावतीने नवानगर येथील रस्ते, नवानगर मराठी शाळा परिसर, सार्वजनिक पाणीपुरवठा, समुद्रकिनारा या ठिकाणी प्लास्टिकमुक्ती व स्वच्छता करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी कुळ्ये, महिला मंडळाच्या अध्यक्षा विशाखा रोहिलकर, माजी सरपंच नंदकुमार रोहिलकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास धोपावकर, मारुती रोहिलकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, महिला मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्या शैलजा रोहिलकर, प्रिया रोहिलकर, नंदिनी रोहिलकर, सुजाता रोहिलकर, योगिनी तिमसेकर, प्राजक्ता रोहिलकर, माधवी रोहिलकर, दीप्ती रोहिलकर, सुहासिनी कोळथरकर, विनंती रोहिलकर, मयुरी पेवेकर, दक्षता नाटेकर, सुगंधा कोळथरकर, स्नेहल रोहिलकर, शैला जांभारकर, मंगला रोहिलकर, विनंती खडपकर, अक्षया ढोर्लेकर, विजया रोहिलकर, दीक्षा रोहिलकर, प्राजक्ता रोहिलकर, सुनिता खडपकर, नयना रोहिलकर, दीपिका वेलणकर, लता खडपकर, साक्षी रोहिलकर, रामेश्वरी नाटेकर, मनिषा जांभारकर, प्रतीक्षा रोहिलकर, प्रभावती खडपकर, रोशनी रोहिलकर, लता रोहिलकर यांच्यासह महिला मंडळाच्या सर्व सदस्य या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
या अभिनव उपक्रमामुळे स्वच्छ - सुंदर नवानगरच्या वैभवात भर पाडली असून, येथील महिलांनी पुढाकार घेत स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. महिलांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. तसेच महिलांचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असेही आवाहन करण्यात येत आहे. भविष्यात महिला मंडळाच्यावतीने मेणबत्ती प्रशिक्षण, अगरबत्ती प्रशिक्षण, बचतगट आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. याद्वारे महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देतानाच त्यांच्या आर्थिक विकासासाठी मंडळ कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्षा विशाखा रोहिलकर यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Women took the initiative and carried out the Planned Action Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.