महिला लोकशाही दिन २० रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:38 AM2021-09-17T04:38:10+5:302021-09-17T04:38:10+5:30
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. सप्टेंबर महिन्याचा महिला ...
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. सप्टेंबर महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दि.२० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत होणार आहे.
लोकशाही दिनाला अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून निवेदन सादर करतात व त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील महिला संबधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहिबाबत निर्देश देण्यात येतात. ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही अशा महिलांच्या सोयीच्या दृष्टीने महिलांना प्रायोगिक तत्वावर फोनद्वारे संपर्क करून लाेकशाही दिनी १०७७ या टाेल फ्री क्रमांकावर निवेदन किंवा अर्ज सादर करता येतील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी सांगितले आहे.