चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 12:33 PM2021-03-12T12:33:49+5:302021-03-12T12:35:16+5:30

pwd Chiplun Highway Ratnagiri-गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शहरातील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. बहादूरशेखनाका येथून ही सुरुवात झाली आहे. सिंगल पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल १८३५ मीटर लांबीचा असेल. एकूण ४५ पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

Work on flyover at Chiplun finally started | चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू

चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देउड्डाणपूल १८३५ मीटर लांबीचा, ४५ पिलरवर उभारणार उड्डाणपूलतब्बल दोन ते तीनवेळा हे रॉक टेस्टींग

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शहरातील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. बहादूरशेखनाका येथून ही सुरुवात झाली आहे. सिंगल पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल १८३५ मीटर लांबीचा असेल. एकूण ४५ पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणात शहरात उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. वाशिष्ठी नदीजवळ सुरू होणारा हा उड्डाणपूल युनायटेड हायस्कूलजवळ संपणार आहे. सध्या पुलाच्या कामासाठी बहादूरशेखनाका येथे खोदाईला सुरुवात झाली आहे. पुलाच्या पूर्व तयारीसाठी जमिनीत बोअरवेल मारून मातीच्या थराची तपासणी करण्यात आली होती. तब्बल दोन ते तीनवेळा हे रॉक टेस्टींग करण्यात आले होते. त्यानंतर सध्या प्रत्यक्ष पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

हा उड्डाणपूल केवळ सिंगर पिलरवर उभारण्यात येणार आहे. पुलाची लांबी ही १८३५ मीटर आहे. उड्डाणपुलासाठी एकूण ४५ पिलर उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पॅन हा ४० मीटरचा राहणार आहे. पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने सर्व्हिस रोडच्या कामानेही वेग घेतला आहे. बहादूरशेख येथील पोलीस चौकी महामार्गात बाधित झाली. चौकीचे बांधकाम तोडून तेथे रस्ता तयार करण्यात आला आहे. बहादूरशेख नाका येथेच एक कंटेनर पोलिसांसाठी ठेवण्यात आला आहे. तेथून पोलिसांचे काम सुरू आहे.

बहादूरशेख नाका ते पागपर्यंत सर्व्हिस रोड ठेवला जाणार आहे. त्याचे कामही गतीने सुरू आहे. शहरात काही जमिनी व इमारतींना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे संपादन अजून झालेले नाही. त्याठिकाणी गटाराचे काम काही फूट आतमध्ये घेण्यात आले आहे. सर्व्हिस रोडची कामे ही काही ठिकाणी मार्गी लागली आहेत, तर उर्वरित ठिकाणी ती मार्गी लावली जात आहेत.

युनायटेड हायस्कूलजवळ संपणारा हा उड्डाणपूल पागनाका येथे पॉवर हाऊसपर्यंत नेण्याची मागणी लोकांकडून करण्यात आली होती. त्यासाठी चिपळूणच्या नगर पालिकेने ठराव केला. नागरिकांनी त्यासाठी आंदोलनेही केली; मात्र त्याचा राष्ट्रीय महामार्ग विभागावर काहीच परिणाम झालेला नाही. उड्डाणपुलाच्या कामात कोणताही बदल झालेला नसून, मूळ नियोजित ठिकाणीच हा पूल उभा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पुलाचे काम सुरू असताना वाहतूक व्यवस्थेत बदल केला जात आहे. पुलाच्या कामाला दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यादृष्टीने पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम मार्गी लागावे, यासाठी ठेकेदार कंपनीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Web Title: Work on flyover at Chiplun finally started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.