खेड तालुक्यात महामार्गाचे काम पूर्ण होण्यास २०२२ उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:48+5:302021-04-08T04:31:48+5:30

खेड : तालुक्याच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मे २०२० अखेर ठेकेदार कंपनीला हे काम कोणत्याही परिस्थितीत ...

The work of highway in Khed taluka will be completed by 2022 | खेड तालुक्यात महामार्गाचे काम पूर्ण होण्यास २०२२ उजाडणार

खेड तालुक्यात महामार्गाचे काम पूर्ण होण्यास २०२२ उजाडणार

googlenewsNext

खेड : तालुक्याच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मे २०२० अखेर ठेकेदार कंपनीला हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे होते. मात्र चौपदरीकरणाच्या कामात काही ठिकाणी ओव्हरब्रिज वाढविण्यात आल्याने कशेडी ते परशुराम घाटादरम्यानचे काम पूर्ण व्हायला २०२२ उजाडणार आहे.

कशेडी घाटाचा पायथा ते परशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमीटरचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतले तेव्हा या कामात भरणे, पीरलोटे आणि दाभीळ येथील ओव्हरब्रिजचे काम समाविष्ट नव्हते. त्यामुळे या ४४ किलोमीटरचे काँक्रिटीकरण मे २०२० अखेर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन ठेकेदार कंपनीकडून देण्यात आले होते. कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे कामही वेळेत पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. दरम्यान, कोरोना महामारीमुळे गतवर्षी लॉकडाऊन झाले आणि मजूर गावाकडे परतल्याने महामार्गाचे काम ठप्प झाले.

कोरोनाची पहिली लाट काही अंशी ओसरल्यावर गावाकडे गेलेल्या मजुरांना पुन्हा बोलावून ठेकेदार कंपनीने कामाला सुरुवात केली. मे २०२१ अखेर ४४ किलोमीटर महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करायचेच हा कंपनीचा निर्धार होता. मात्र भरणे, दाभीळ आणि पीर लोटे या तीन ठिकाणी ओव्हरब्रिज बांधण्याचे काम वाढले आणि चौपदरीकरणाचे काम पुन्हा एकदा रखडले.

सद्य:स्थितीत भरणे, दाभीळ आणि पीर लोटे या तीन ठिकाणच्या ओव्हरब्रिजचे काम सोडले तर अन्य ठिकाणचे चौपदरीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे एखाद‌्दुसऱ्या किलोमीटरचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले नसेल; परंतु ते काम येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. परशुराम घाटाचा काही भाग आणि तीन ओव्हरब्रिजचे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने कशेडी ते परशुराम घाट या ४४ किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्यास २०२२ साल उजाडण्याची शक्यता आहे.

...............................

khed-photo71 खेड : महामार्गावर नवीन मंजूर झालेल्या ओव्हरब्रिजचे काम प्रगतिपथावर आहे.

Web Title: The work of highway in Khed taluka will be completed by 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.