क्रांतिकारांचे कार्य अद्वितीय : अंशुमन मगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:31 AM2021-03-26T04:31:02+5:302021-03-26T04:31:02+5:30
फोटो ओळी - महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी क्रांतिकारकांना अभिवादन केले. लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : भगतसिंग, राजगुरु ...
फोटो ओळी - महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी क्रांतिकारकांना अभिवादन केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : भगतसिंग, राजगुरु व सुखदेव या थोर क्रांतिकारकांचे कार्य अद्वितीय असे आहे. त्यांच्या अलौकिक कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा. त्यांचे बलिदान, त्या काळातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यात अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रा. अंशुमन मगर यांनी व्यक्त केले.
विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे शहीद दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्रा. अंशुमन मगर यांच्या हस्ते भगतसिंग, राजगुरु, सखदेव या क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रथमेश जाधव यांनी केले. प्रा. रकमन्ना मेटकरी असे म्हणाले की, या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य वेचले. आजही संपूर्ण देशाला त्यांच्या विचारांची आणि कृतीची आवश्यकता आहे असे सांगितले. यासोबतच शीतल पाटील या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले.