सहकारामध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे कामकाज आदर्शवत : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:33 AM2021-05-21T04:33:12+5:302021-05-21T04:33:12+5:30
रत्नागिरी : सहकारामध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आदर्शवत असे काम केले आहे. पतसंस्थेने घेतलेली भरारी निश्चितच काैतुकास्पद असल्याचे गाैरवाेद्गार विराेधी ...
रत्नागिरी : सहकारामध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आदर्शवत असे काम केले आहे. पतसंस्थेने घेतलेली भरारी निश्चितच काैतुकास्पद असल्याचे गाैरवाेद्गार विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर गुरुवारी चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी रत्नागिरी येथे आले होते. यावेळी त्यांनी पतसंस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी त्यांचा सत्कार केला. पतसंस्थेच्या कामकाजाची सर्व माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. पतसंस्थेतर्फे कर्जदार, ठेवीदारांसाठी योजना आणि सामाजिक बांधीलकी म्हणून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहितीही फडणवीस व दरेकर यांनी घेतली. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे आदर्शवत कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे यांचाही पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला़
संस्थेच्या कार्यालयातच नुकसानग्रस्त आंबा व्यावसायिक व मच्छिमार यांची बैठक बोलाविण्यात आली होती. नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छिमार यांनी आपल्या अडचणी व समस्या फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. त्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी आंबा व्यावसायिकांना दिले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, प्रसाद गोगटे, व्यवस्थापक बापट, उपव्यवस्थापक रेडीज यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------------
रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला भेट दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ॲड. दीपक पटवर्धन यांनी सत्कार केला.