लांजा महाविद्यालयात उद्यापासून कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:21 AM2021-06-21T04:21:37+5:302021-06-21T04:21:37+5:30
लांजा : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व एक्यूएसी विभागातर्फे ‘लोकरंग महाराष्ट्राचे’ या तीन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन ...
लांजा : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व एक्यूएसी विभागातर्फे ‘लोकरंग महाराष्ट्राचे’ या तीन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २२ ते २४ जून या कालावधीत हाेणार आहे.
महाराष्ट्राची लोकधारा, शाहिरांची दिव्य परंपरा आणि लोक कलाकारांचा इतिहास यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. दि. २२ जून रोजी लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन या विषयावर लोककला अकादमी मुंबई विद्यापीठाचे प्रमुख डॉ.गणेश चंदनशिवे, दि. २३ जून रोजी पोवाडा एक प्रवास यावर शिवशाहीर डॉ.पुरुषोत्तम उर्फ राजू कृष्णाजी राऊत तर दि. २४ जून रोजी भारुड लोकरंजनातून प्रबोधन या विषयावर भोगावती हायस्कूल कोल्हापूरचे मुख्याध्यापक नेताजी डोंगले हे मार्गदर्शन करणार आहेत.
या ऑनलाइन कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेश माळी व एक्यूएसी विभागाचे प्रमुख काशिनाथ चव्हाण यांनी केले आहे.