जागतिक मत्स्यपालन दिन : शोभीवंत माशांची कोट्यवधींची उड्डाणे, रंगीबेरंगी मासे फुलवतात सौंदर्य

By अरुण आडिवरेकर | Published: November 22, 2022 12:31 PM2022-11-22T12:31:40+5:302022-11-22T12:32:56+5:30

मासे पाळणे हा छंद गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. मासा शांत आणि आवाज न करणारा प्राणी असल्याने ताे पाळण्याकडे अनेकांचा कल असताे. त्यासाठी बाजारात विविध प्रकारचे ‘फिशटँक’ किंवा बाउल उपलब्ध करून देणारी दालने तयार हाेऊ लागली आहेत. 

World Fisheries Day crore of sales of elegant fish, colorful fish exude beauty | जागतिक मत्स्यपालन दिन : शोभीवंत माशांची कोट्यवधींची उड्डाणे, रंगीबेरंगी मासे फुलवतात सौंदर्य

जागतिक मत्स्यपालन दिन : शोभीवंत माशांची कोट्यवधींची उड्डाणे, रंगीबेरंगी मासे फुलवतात सौंदर्य

googlenewsNext

अरुण आडिवरेकर -

रत्नागिरी : काेणी घराची शाेभा वाढविण्यासाठी तर काेणी हाैस म्हणून घराघरात शाेभीवंत मासे पाळले जात आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत शहरी बाजारपेठेत रंगीबेरंगी माशांसाठी वेगळी बाजारपेठ तयार झाली आहे. या बाजारपेठेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात वर्षाला काेट्यवधींची उलाढाल हाेत आहे. त्यातून तरुणांच्या हाताला काम मिळू लागले आहे.

मासे पाळणे हा छंद गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. मासा शांत आणि आवाज न करणारा प्राणी असल्याने ताे पाळण्याकडे अनेकांचा कल असताे. त्यासाठी बाजारात विविध प्रकारचे ‘फिशटँक’ किंवा बाउल उपलब्ध करून देणारी दालने तयार हाेऊ लागली आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास २५ ॲक्वेरियमची दुकाने आहेत. या दुकानांमधून दिवसाला तीन ते चार हजार रुपयांची विक्री हाेते. या माशांच्या व्यवसायातून वर्षाला सुमारे सव्वातीन काेटी इतकी उलाढाल हाेत आहे. रंगीबेरंगी माशांच्या दुनियेने,  ते पाळण्याच्या हौसेने तरुणांना राेजगाराचा एक नवा मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

सकारात्मक ऊर्जा वाढते
- पाण्याच्या दिशानिर्देशांमध्ये ॲक्वेरियम ठेवल्याने तेथील सकारात्मक ऊर्जा वाढते, असे सांगितले जाते. त्यामुळेही काही जण मासे पाळतात. 
- त्यासाठी याेग्य दिशा काेणती, हेही पाहिले जाते, तर काेणता मासा पाळणे चांगले, याचा अभ्यास करूनही मासे पाळले जातात.

यांना सर्वाधिक पसंती
‘गाेल्ड फिश’ पाळायला अनेकांना आवडताे. त्यानंतर, आरवाना, फ्लाेरान किंवा फ्लाॅवर हाॅर्न, शार्क या माशांना अधिक मागणी आहे. अलीकडे एंजल हा मासाही अधिक पाळला जाताे.

मी २० वर्षे या व्यवसायात असून, अलीकडे मासे पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरीत मुंबईतून मासे आणले जातात. १५ ते २० दिवसांतून एकदा पाणी बदलावे. केवळ ७० टक्केच पाणी बदलावे.
- राजेश नंदकुमार पाटील, व्यावसायिक, रत्नागिरी.
 

Web Title: World Fisheries Day crore of sales of elegant fish, colorful fish exude beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.