यशवंतरावांचे स्मरण विद्यार्थ्यांना स्फूर्तीदायी
By admin | Published: November 28, 2014 09:49 PM2014-11-28T21:49:53+5:302014-11-28T23:54:55+5:30
सुरेश जोशी : यशवंतराव चव्हाण स्मृतीदिनानमित्त कार्यक्रमात प्रतिपादन
रत्नागिरी : महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिलेङ्कमुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत नेतृत्व होते. कोयना प्रकरणासह उद्योग, शेती यासह महाराष्ट्राच्या सर्वंकष विकासासाठी व अग्रेसर राज्यासाठी त्यांनी सुधारणा घडवल्या. त्यांचे स्मरण विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तीदायी आहे. त्यामुुळे त्यांचे जीवनचरित्र सर्वांनी अभ्यासावे, असे आवाहन साहित्यिक तथा देवरूखच्या आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभागीय समितीने यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन पटवर्धन हायस्कूल येथे साजरा केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये, जिल्हाध्यक्ष प्राची शिंदे, विभागीय सदस्य कृ. आ. पाटील, मुुख्याध्यापक विजय वाघमारे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विनायक हातखंबकर, उपमुुख्याध्यापक मिलिंद कदम, भारत शिक्षणङ्कमंडळाचे सहकार्यवाह शशांक गांधी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. जोशी यांनी यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट सांगितला. ते म्हणाले, महाराष्ट्राला अग्रेसर राज्य घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकारणापलिकडचे नेतृत्व असल्यानेच त्यांनी साहित्य, संस्कृती महामंडळ निर्माण केले. सुसंस्कृत समाजकारणी व नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित होते, अशी ओळखही त्यांनी करून दिली. रत्नागिरीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्मङ्क झाला. त्यांनी भगवद्गीतेवर आधारित लिहिलेल्या गीता रहस्य या महान ग्रंथाची पुढील वर्षी शताब्दी आहे. यानिमित्त रत्नागिरीकरांनी वर्षभर विविधांगी कार्यक्रमङ्क करावेत, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण यांची विचारसरणी व साधी राहणी, कर्तबगारी सर्वांना कळण्यासाठी प्रतिष्ठान कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांची जीवनशैली आत्मसातकरावी, यासाठी स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असे राजाभाऊ लिमये यांनी यावेळी सांगितले.
स्मृतिदिनानिमित्त प्रतिष्ठानने सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेतली होती. त्याचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. विजेत्यांची नावे अशी - रत्नागिरी जिल्हा प्रथमङ्क- वैष्णवी सुर्वे (शिवाजीराव सुर्वे माध्यमिक विद्यालय, निवळी, चिपळूण), द्वितीय अनिकेत कोळंबेकर (सुर्वे माध्यमिक विद्यालय, निवळी), उत्तेजनार्थ रजनिगंधा गोताड (अ. आ. देसाईङ्कमाध्यमिक विद्यालय, हातखंबा), सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमङ्क- ओंकार चिंंदरकर (शिरगाव हायस्कूल, देवगड), द्वितीय- प्रतीक्षा तिर्लोटकर (श्रीरामङ्कमाध्यमिक विद्यामंंदिर, पडेल, देवगड). पालघर जिल्हा प्रथम सम्राज्ञी हंबिरे (जनता हायस्कूल, नवापूर), द्वितीय ङ्कमानसी घरत (जनता हायस्कूल).
परीक्षण व मदत करणाऱ्या मान्यवरांना यावेळी प्रशस्तीपत्र, गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी चव्हाण यांनी केले. सुभाष पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)