युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणमध्ये योग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:46+5:302021-06-22T04:21:46+5:30
अडरे : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या ...
अडरे : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून वनौषधी मार्गदर्शक डॉ. रत्नाकर थत्ते, डॉ. वृक्षाली बापट, डॉ. विद्यानंद दीक्षित, प्रशालेचे पर्यवेक्षक संजय बनसोडे उपस्थित होते. प्रशालेतील क्रीडाशिक्षक समीर कालेकर यांनी योगाची सुरुवात प्रात्यक्षिकांच्या माहितीसह केली. योगासनाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी प्रशालेतील आंतरराष्ट्रीय खेळाडू व आर्या उदय तांबे व राष्ट्रीय खेळाडू स्वराली उदय तांबे यांनी उत्तम असे योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. प्राणायाम प्रशालेचे क्रीडाशिक्षक सोमनाथ सुरवसे यांनीही प्रात्यक्षिक करून दाखवली. त्याचप्रमाणे डॉ. रत्नाकर थत्ते यांनी योगाचे महत्त्व सांगितले. या योगासन कार्यक्रमासाठी कलाशिक्षक विशाल कदम, संदीप मुंढेकर यांचे सहकार्य लाभले. प्रशालेचे मुख्याध्यापक कृष्णत शिंदे, उपमुख्याध्यापिका वीणा चव्हाण, पर्यवेक्षक संजय बनसोडे, पर्यवेक्षिका स्वप्नाली पाटील यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.