दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी योगिता बांद्रे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:31 AM2021-05-09T04:31:41+5:302021-05-09T04:31:41+5:30
दापोली : दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या गिम्हवणे गणातील सदस्य योगिता बांद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ आहे. ...
दापोली : दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या गिम्हवणे गणातील सदस्य योगिता बांद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्णै पंचायत समिती गणाचे सदस्य रऊफ हजवाने यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने दापोली पंचायत समितीचे सभापतीपद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर बांद्रे यांची वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार यांनी ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडली. या पदासाठी योगिता बांद्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे सभापतीपदी योगिता बांद्रे यांचीच वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले हाेते. त्यावर शुक्रवारी शिक्कामाेर्तब करण्यात आले.
दापोली पंचायत समितीचे सभापती निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम, प्रांतिकचे सदस्य मुजीब रुमाने, तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, रवींद्र कालेकर, विजय मुंगसे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र गुजर, चंद्रकांत बैकर, दीपक खळे, काळूराम वाघमारे, माजी सभापती ममता शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता तांबे, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, पंचायत समितीचे माजी सभापती किशोर देसाई उपस्थित होते.
दापाेली पंचायत समितीच्या सभापतीपदी याेगिता बांद्रे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.