मुंबईकडे जाणाऱ्या तीन रेल्वेच्या आरक्षणासाठी करावी लागते प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:22 AM2021-06-17T04:22:18+5:302021-06-17T04:22:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातून मुंबईसह आंतरराज्य मार्गावर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू आहे. गेले दीड वर्ष दोन पॅसेंजर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातून मुंबईसह आंतरराज्य मार्गावर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू आहे. गेले दीड वर्ष दोन पॅसेंजर गाड्या बंद आहेत. मुंबई मार्गावरील कोकणकन्या, तुतारी, जनशताब्दी एक्स्प्रेससाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. वीकेंडला तर या गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर एकूण २३ गाड्या सुरू आहेत. दिल्ली, गुजरात, राजस्थान, केरळ या राज्यांतून धावणाऱ्या सहा गाड्या प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद करण्यात आल्या आहेत. अनलाॅकमुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. शिवाय कोरोना चाचणीची अटही आता शिथिल करण्यात आल्याने मुंबईकडून येणाऱ्या व जाणाऱ्या गाडीतील प्रवासी संख्या वाढली आहे.
कोकण रेल्वेच्या मुंबई ते मडगाव मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख रेल्वे
राज्यराणी (तुतारी)
जनशताब्दी एक्स्प्रेस
मत्स्यगंधा एक्स्प्रेस
गांधीधाम एक्स्प्रेस
काेचुवेली एक्स्प्रेस
दुरांताे एक्स्प्रेस
एसीला वेटिंग नाही
कोरोनामुळे एसी डब्यातील आरक्षणाची मागणी कमी झाली आहे. सुरुवातीला असणारी प्रतीक्षा आता कमी झाली आहे. मोजकेच प्रवासी एसी आरक्षण करतात.
पॅसेंजरबाबत निर्णय नाही.
कोकण रेल्वे मार्गावरील ‘दादर-सावंतवाडी’ व ‘दिवा-सावंतवाडी’ या दोन पॅसेंजर रेल्वे दीड वर्षांपासून बंद आहेत.
पॅसेंजर गाड्यांना होणारी गर्दी यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखणे शक्य होणार नाही.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने गणेशोत्सव काळातही गाडी सुरू होणे शक्य नाही.
दीपावलीनंतर रुग्णसंख्या घटली तर पॅसेंजर सुरू करण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
आंतरराज्य लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद अल्प लाभत असल्याने मध्य रेल्वेने दिल्ली, गुजरात, राजस्थान, केरळ मार्गावरील सहा गाड्या बंद केल्या आहेत. गणेशोत्सव कालावधीत या गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे.
‘कोकणकन्या’साठी वेटिंग
मुंबई-मडगाव मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यापाठोपाठ तुतारी व जनशताब्दी एक्स्प्रेसला आहे. वीकेंड, तसेच सुटीमध्ये आरक्षण सहसा उपलब्ध होत नाही, प्रतीक्षा करावी लागते.