स्वत:च्या साखरपुड्याचे साहित्य घेऊन जाणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:28 AM2021-04-05T04:28:02+5:302021-04-05T04:28:02+5:30

लांजा तालुक्यातील कुंभारवाडी येथे ट्रकच्या खाली येऊन झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी ट्रकच्या चाकाखाली अडकून पडली ...

A young man carrying his own sugar cane died in an accident | स्वत:च्या साखरपुड्याचे साहित्य घेऊन जाणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

स्वत:च्या साखरपुड्याचे साहित्य घेऊन जाणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

Next

लांजा तालुक्यातील कुंभारवाडी येथे ट्रकच्या खाली येऊन झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी ट्रकच्या चाकाखाली अडकून पडली हाेती. (छाया : अनिल कासारे)

लाेकमत न्यूज नेटवर्क

लांजा : आपल्या साखरपुड्याचे साहित्य घेऊन घरी जाणाऱ्या ओशी येथील २२ वर्षीय तरुणाची दुचाकी ट्रकखाली येऊन झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर कुंभारवाडी येथे घडली. अक्षय केशव साेलीम (२२, रा. ओशी, लांजा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुदैवाने त्याच्या साेबत असणारा तरुण बचावला आहे.

हरचिरीजवळील ओशी येथील अक्षय केशव सोलीम याचा रविवारी सायंकाळी उपळे येथील मुलीशी साखरपुडा हाेता. साखरपुड्याला लागणारे साहित्य घेण्यासाठी अक्षय दुचाकी डिओ (क्र. एमएच ०८, एडब्लू ९४६६) वरून आपल्याच वाडीतील निलेश वासुदेव घाणेकर याला घेऊन लांजा येथे आला हाेता. वस्तूंची खरेदी करून तो वेगाने घरी निघाला हाेता. लांजा-कुंभारवाडी शिवा मेस्त्री यांच्या गॅरेजच्या पुढे आला असता मुंबईकडे जाणारे प्रथमेश दिनेश सावंत यांच्या इर्टिगा कारला (क्र. एमएच ०१ डीके ८३५७) ओव्हरटेक करीत असताना अक्षयच्या दुचाकीचा आरसा कारला लागून त्याचा ताेल गेला. त्यानंतरही त्याने गाडी सावरण्याचा प्रयत्न केला असता इर्टिगाला दुचाकी घासली गेली. त्याचवेळी उजव्या बाजूने संताेष सत्यवान रसाळ (रा. पूनस) हे ट्रकमध्ये (एमएच ०९, क्यू ५५२९) जांभा चिरा भरून लांजाकडे येत हाेते. इर्टिगा आणि ट्रकमधून आपण जाऊ असे वाटत असतानाच दुचाकी इर्टिगाला घासून ट्रकखाली गेली. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला. मागे बसलेला निलेश वासुदेव घाणेकर रस्त्याच्या डाव्या बाजूला फेकला गेल्याने तो बचावला. मात्र त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला व हाताच्या कोपराला किरकोळ दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, उपनिरीक्षक श्वेता पाटील, उपनिरीक्षक प्रशांत जाधव, हेडकाॅन्स्टेबल श्रीकांत जाधव, राजेंद्र कांबळे, तेजस मोरे, दत्ता शिंदे, चालक राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.

चाैकट

संसाराचे स्वप्न अर्धवटच

सात ते आठ महिन्यांपूर्वी अक्षय याने गाडी घेतल्याचे त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले. अक्षयचा रविवारी सायंकाळी उपळे येथील मुलीशी साखरपुडा होता. तर लग्न बुधवार, दि. ७ एप्रिल रोजी होते. दोघांनी संसाराची रंगवलेली स्वप्न अतिघाई केल्याने धुळीला मिळाली. अक्षय याचे आईवडील तसेच मोठा असे छोटे कुटुंब आहे.

Web Title: A young man carrying his own sugar cane died in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.