पाय घसरून पाण्यात पडल्याने शीळ धरणात तरुण बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:00 PM2020-05-04T22:00:50+5:302020-05-04T22:01:01+5:30
रात्री उशिरापर्यंत शोध सुरू
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील शीळ गावातील आंबेकरवाडी येथे शीळ धरणामध्ये पाय घसरून पडल्याने एक तरुण बुडाला आहे. राजेश आंबेकर (२३, रा. शीळ, ता. रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.
सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. त्यानंतर धरणात बुडालेल्या या तरुणाचा शोध रात्री उशिरापर्यंत घेतला जात होता. हा तरुण लाकडे घेऊन घरी परत येत होता. तरुण बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती महेश म्हाप तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणाचा शोध लागला नव्हता.