आपले काम आपली स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:32 AM2021-09-19T04:32:06+5:302021-09-19T04:32:06+5:30

सातत्याने बसल्याने पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात. (कदाचित म्हणूनच बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये पित्ताचा त्रास म्हणजेच ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो, ...

Your work your status | आपले काम आपली स्थिती

आपले काम आपली स्थिती

Next

सातत्याने बसल्याने पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात. (कदाचित म्हणूनच बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये पित्ताचा त्रास म्हणजेच ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो, असे वाटतेय, अर्थात या पित्ताच्या त्रासाची अनेकविध कारणे आहेत; पण हेही एक कारण नक्कीच आहे.) मात्र उभे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये पचनक्रिया सुलभ होते. (कदाचित म्हणूनच हजारो वर्षे भारतीय आयुर्वेद जेवणानंतर ‘शतपावली’ करा, असे सांगत आहेत.) उभे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये मधुमेह आणि हृदयविकाराचे प्रमाण कमी असते, कारण त्यांची सुलभ पचनक्रिया असल्याचे संशोधकांनी सांगितले. उभे राहिल्याने शरीराची चरबी ‘३२’ टक्क्यांनी घटते, असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे. म्हणूनच या टीमचे प्रमुख डॉ. शुवाल पुढे म्हणतात, ‘तुम्ही काम करीत असलेल्या वेळेपैकी निम्मा वेळ उभे राहत असाल तर तुम्हाला ५९ टक्के लठ्ठपणाचा धोका नाही आणि महिलांमध्ये त्यांना किचनमध्ये सातत्याने उभे राहून काम करावे लागते म्हणून हा धोका त्यांच्यामध्ये ४७ टक्के कमी होतो.

म्हणूनच संगणकावर काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा जास्त वाढतो. पोटाचा घेर वाढतो. पित्ताचा आणि आनुषंगिक पोटाच्या चयापचयक्रियांचा त्रास जास्त असतो. सातत्याने म्हणूनच स्क्रिनवर किंवा टीव्हीच्या पडद्यावर नसावे. सातत्याने बसणे टाळावे; पण बसूनच काम आहे, काय करणार? त्यावर उपाय म्हणूनच आपण आता काही टिप्स उपयोगात आणणार आहोत.

१) साधारण अर्धा ते पाऊणतास सातत्याने कॉम्प्युटरवर बसलो. चक्क आता उभे राहू या. थोडं चालून येऊ या. एक-दोन मिनिटांची ही फेरी ताजेतवानेपणाचा फिल देईल. डोळ्यांवरचा ताण कमी करील. हालचाली झाल्या म्हणून पोटाचे त्रास कमी होतील. २) अर्थात काही कामे अशी असतात तेव्हा स्क्रिनपुढून घंटो न घंटो हालता येत नाही. महत्त्वाच्या मीटिंग्स, समोर ग्राहक बसला आहे, त्यावेळेस गोची होणारच की. अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्यावेळेस आपण आपल्या जागेवरून हलूच शकत नाही. सांगणं सोपं असतं; पण काही प्रसंग असे असतात की त्यावेळेस जागेवरून उठणं, शिस्त संमत नसतं. कामाचं स्वरूप बिघडतं. समोरची गरजू व्यक्ती नाराज होते. अशा वेळेस काय करावं. चक्क बसल्या जागेवरच पायांच्या हालचाली कराव्यात. अगोदरच्या लेखामध्ये (दिनांक ५.०९.२०२१ चा फिटनेस फंडा) सांगितल्याप्रमाणे हालचाली कराव्यात. ३) हालचाली करीत राहणं या सर्व गोष्टींवर रामबाण उपाय आहे. त्यामुळे एक फ्रेशनेस फिलपण येतो. ४) मध्येच एक खोल श्वास घेणे, तो धरून ठेवणे. साधारण ५ ते ७ सेकंद-ते सहज जमलं. कुणाला लक्षातही येत नाही. मग सोडणे. कालांतराने ती सवयपण होऊन जाते. ती सर्व शारीरिक सिस्टमना पोषक ठरते. प्रदीर्घ काळ पोटाचा घेर वाढू नये, याची काळजीपण घेते. ५) मध्येच जर टेबल खाली जागा असेल, समोरच्याला लागणार नसेल (नाही तर काही वेळेस अनर्थ व्हायचा.) तर आलटूनपालटून पाय लांब करावा. यामुळेही हालचाली होतात. ६) ड्रायव्हिंग जॉब्समध्ये उदा. एस.टी.चे ड्रायव्हर किंवा कुठल्याही वाहनाचे चालक यांनी अर्ध्या पाऊणतासाने चक्क गाडी थांबवून पायउतार व्हावे. एक-दोन मिनिटे फेरफटका मारावा. या साध्या गोष्टी मनावरचा ताण हलका करतील. फ्रेशनेसचे गिफ्ट देईल. एकाच पोझिशनमध्ये राहून होणारे विकार दूर पळतील. बघा, प्रयत्न करून. तेही नाही जमले तर सकाळीच फिरायला जावे. एक उत्तम पर्याय आहे. सर्वांगीण आरोग्यासाठी!

- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी

Web Title: Your work your status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.