Chiplun News: चिपळुणात पॉवर टिलरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 06:46 PM2022-06-01T18:46:19+5:302022-06-01T19:14:21+5:30

शेताच्या बांधांवरून पॉवर टिलर खाली उतरत असताना इंजिनाच्या लोडमुळे पॉवर टिलर हॅन्डल वरच्या बाजुला उचलले गेले. त्यामुळे हॅन्डल खाली करण्यासाठी महेंद्र हे हॅन्डलवर उभे राहून पायाने हँडल खालील बाजूस दाबण्याचा प्रयत्न करीत होते. यातच त्याचे दोन्ही पाय सटकून पावर टिलरच्या नांगरामध्ये अडकले.

Youth dies after getting stuck in power trailer in Chiplun | Chiplun News: चिपळुणात पॉवर टिलरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

Chiplun News: चिपळुणात पॉवर टिलरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

Next

चिपळूण : भात पेरणीच्या कामासाठी पॉवर टिलर चालवत असताना दोन्ही पाय सटकून ते पॉवर टिलरच्या नांगरामध्ये अडकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा डेरवण हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मांडकी येथे घडली. महेंद्र पांडुरंग मोरे (वय-३४, मांडकी) असे मृत्यू शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, मांडकी गावचे हद्दीत हिरु खांबे व महेंद्र मोरे हे शेतामध्ये मिनी पॉवर टिलरने भात पेरणी व नांगरणी करीत होते. भाताची पेरणी व नांगरणी झाल्यानंतर महेंद्र हे दुसऱ्या शेतामध्ये पॉवर टिलर नेत होते. यावेळी शेताच्या बांधांवरून पॉवर टिलर खाली उतरत असताना इंजिनाच्या लोडमुळे त्याचे हॅन्डल वरच्या बाजुला उचलले गेले. त्यामुळे हॅन्डल खाली करण्यासाठी महेंद्र हे हॅन्डलवर उभे राहून पायाने हँडल खालील बाजूस दाबण्याचा प्रयत्न करीत होते.

यातच त्याचे दोन्ही पाय सटकून पावर टिलरच्या नांगरामध्ये अडकले व ते करंबरेपर्यंत मशिनमध्ये ओढले गेले. त्यांना हिरु खांबे यांच्यासह अन्य लोकांनाच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 

Web Title: Youth dies after getting stuck in power trailer in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.