पोहताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, गुहागरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 05:39 PM2023-07-06T17:39:53+5:302023-07-06T17:43:59+5:30

सर्वजण घरी निघाले असता काही अंतरावरुन पुन्हा तलावाकडे गेला अन्..

Youth drowned in lake while swimming, incident in Guhagar | पोहताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, गुहागरातील घटना

पोहताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, गुहागरातील घटना

googlenewsNext

संकेत गाेयथळे

गुहागर : मित्रांसाेबत पाेहून झाल्यानंतर पुन्हा तलावात पाेहायला गेलेल्या काेंडकारुळ (ता. गुहागर) येथील २४ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. प्रज्याेत मेहता (रा. जागकरवाडी, काेंडकारूळ, गुहागर) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना काल, बुधवारी (५ जुलै) साखरी आगर येथे घडली. 

प्रज्योत हा आपल्या मित्रांसमवेत बुधवारी दुपारी साखरी आगर येथील तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत कोंडकारूळ येथील दोघेजण होते. तर यावेळी तलावात वेळणेश्वर व साखरी आगर येथील काही तरुणही पोहत होते. दुपारपासून सायंकाळपर्यंत हे सर्वजण तलावात पाेहत हाेते. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हे सर्वजण घरी निघाले.

तलावापासून काही अंतरावर साखरीआगर फाटा येथे गेल्यानंतर प्रज्योतने आपल्यासमवेत दुचाकीवर असलेल्या मित्रांना मला पुन्हा पोहायचे आहे, असे सांगत दुचाकी तलावाकडे नेली. मित्रांनी आपण आता घरी जाऊया, असे त्याला सांगितले. मात्र, मित्रांचे न ऐकता प्रज्योतने पाण्यामध्ये उडी मारली. बराचवेळ झाला तरी तो पुन्हा वर आला नाही. 

आपला मित्र पाण्याच्या बाहेर येत नाही, असे लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी पाण्यात उडी मारली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढले. तातडीने त्यांनी पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणतीच हालचाल करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्या मित्रांनी तात्काळ त्याला हेदवी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लुकमान तडवी, किशोर साळवी यांनी पंचनामा केला. गुहागर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Youth drowned in lake while swimming, incident in Guhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.