जिल्हा परिषदेच्या स्रेहसंमेलनाला थाटात प्रारंभ; मकरंद अनासपुरे येणार

By admin | Published: February 13, 2015 10:09 PM2015-02-13T22:09:45+5:302015-02-13T22:57:27+5:30

फनीगेम्समध्ये अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये संगीतखुर्ची, लिंबूचमचा व अन्य स्पर्धा घेण्यात आल्या.

Zilla Parishad's session begins; Makrand Anaspure will come | जिल्हा परिषदेच्या स्रेहसंमेलनाला थाटात प्रारंभ; मकरंद अनासपुरे येणार

जिल्हा परिषदेच्या स्रेहसंमेलनाला थाटात प्रारंभ; मकरंद अनासपुरे येणार

Next

रत्नागिरी : जिल्हा परिषद कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, रत्नागिरीतर्फे आयोजित २०वे वार्षिक स्नेहसंमेलनाचा मोठ्या थाटात शुभारंभ झाला. शनिवारी मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते विविध स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या संमेलनाची सुरूवात रंगावली प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. रंगावली प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्याहस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिक्षण व अर्थ सभापती ऐश्वर्या घोसाळकर, समाजकल्याण सभापती शीतल जाधव, महिला व बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, रत्नागिरी पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी, मंडळाचे अध्यक्ष वामन कदम यांच्या उपस्थित होते.यावेळी पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. पाककला स्पर्धेमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विविध पदार्थ बनवून प्रदर्शनासाठी ठेवले होते. फनीगेम्समध्ये अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये संगीतखुर्ची, लिंबूचमचा व अन्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामुळे. जिल्हा परिषदेतील आज सर्वच अधिकारी, कर्मचारी स्नेहसंमेलनामध्ये गुंतले होते. सायंकाळी उशिरा कर्मचारी, अधिकाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. रात्री १० वाजता स्वागतगीत, नाट्यछटा, होममिनिस्टर स्पर्धा, नकला, रेकॉर्ड डान्स, लोकनृत्ये, महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि फॅन्सीड्रेस आदींमध्ये परिषद भवन परिसरात कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पुरेपुर आनंदोत्सव साजरा केला. शनिवारी सकाळी ११ वाजता आरती व भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर, दुपारी १२ वाजता अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या पऋमुख उपस्थितीत, अध्यक्ष राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम, उपाध्यक्ष शेवडे, बांधकाम व आरोग्य सभापती डॉ. अनिल शिगवण आदींच्या उपस्थित बक्षीस वितरण होणार आहे. त्यांनतर सायंकाळी ६. ३० वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि रात्रौ १०. ३० वाजता सदाबहार आॅर्केस्ट्रा रंगीला हा कार्यक्रम होणार आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Zilla Parishad's session begins; Makrand Anaspure will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.