घर हवे ऐसपैस अन् आलिशान लक्झरी घरांची विक्री वाढली, २७ टक्के वाढीची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 08:34 AM2024-07-25T08:34:36+5:302024-07-25T08:34:49+5:30
देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये आलिशान अर्थात लक्झरी घरांची विक्री यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत २७ टक्क्यांनी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : स्वतःचे घर असावे, ही प्रत्येकालाच इच्छा असते. पण, गेल्या काही महिन्यांमध्ये आलिशान घरांची मागणी आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये आलिशान अर्थात लक्झरी घरांची विक्री यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत २७ टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत ८,५०० लग्झरी घरांची विक्री झाली आहे.
रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित 'सीबीआरई' या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, लक्झरी घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. ऐसपैस जागा, आधुनिक सुविधा इत्यादींची मागणी वाढत आहे. त्यामुळे लक्झरी घरखरेदीकडे उच्चभ्रू वर्गाचा कल वाढला आहे.
दिल्ली-एनसीआर, मुंबई, हैदराबाद, पुणे शहरात किती विक्री ?
घरांची संख्या अनुक्रमे ३,३०० २,५०० १,३०० १,१००
- चार कोटी किंवा जास्त किंमत असलेली घरे लक्झरी श्रेणीत येतात.
- ८,५०० घरांची विक्री जानेवारी-जून २०२४ या कालावधीत झाली.
- ६,७०० घरांची विक्री गेल्या वर्षी याच कालावधीत झाली होती.
- ८४ टक्के विक्री दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि हैदराबाद या शहरांमध्ये झाली.
- ६०० टक्के एवढी सर्वाधिक वाढ पुण्यात नोंदविण्यात आली आहे.