ग्रीन होम म्हणजे काय? घर बांधायचं असेल तर याचा विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 07:37 PM2018-08-27T19:37:12+5:302018-08-27T19:38:09+5:30

'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो.

What is Green Home? If you want to build a new house, think about it | ग्रीन होम म्हणजे काय? घर बांधायचं असेल तर याचा विचार करा

ग्रीन होम म्हणजे काय? घर बांधायचं असेल तर याचा विचार करा

googlenewsNext

मुंबई- तुम्ही घर घेण्याचा विचार करत आहात का?  मग ग्रीन होम्सचाही विचार करायला हरकत नाही. आता ग्रीन होम्स म्हणजे नक्की काय ते आधी पाहू. 'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो.

हवा, सूर्यप्रकाश ही निसर्गाने दिलेली देणगी घरांसाठी मुबलक वापरायची आणि प्रदूषण कमीत कमी करायचे असा त्याचा मागचा मूळ उद्देश आहे. ही झाली ढोबळ व्याख्या. पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये त्याची वेगवेगळी व्याख्या केल्याचेही दिसून येते. ग्रीन होम्स ही आपल्या नेहमीच्या बांधकामापेक्षा शाश्वत टिकणाऱ्या साधनांच्या मदतीने वापरलेली आणि कमीतकमी ऊर्जा वापरून बांधलेली असतात.

ग्रीन होम्स कशासाठी?- घरोघरी होणारा वीज आणि पाणी यांचा वापर आपल्या खिशावर परिणाम करत असतो. उन्हाळा आला की वीजेचं बिल वाढतं. वीज ही भरपूर वापरली जाते. घरांची दारं-खिडक्या बंद होऊन वातानुकूलन यंत्रणा म्हणजेच एसी सुरु केले जातात. यामुळे खर्चही वाढतो. मात्र ग्रीन होम्समध्ये नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर केला जातो. या नव्या यंत्रणेमध्ये सौर ऊर्जेचा वापर करुन तयार झालेली वीज वापरली जाते. रेन वॉटर हार्वेस्टींग करुन भूजल पातळी वाढवली जाते. पावसाचे पाणी वाचवून त्याचा उपयोग दैनंदिन वापरासाठी केला जातो. यामुळे तुमच्या वीजेच्या बिलावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यात 20 ते 30 टक्के कपात होऊ शकते.

आरोग्यासाठी काय फायदा?- ग्रीन होम्समध्ये नैसर्गिक साधनांचा जास्त वापर केल्यामुळे हवेशिर आणि उत्तम प्रकाशव्यवस्थेची योजना केलेली असते. नैसर्गिक हवेचा उपयोग, हवा शुद्धीकरणासाठी नैसर्गिक उपायांचा वापर, झाडांचा अधिकाधिक वापर, खिडक्यांमधून प्रकाश जास्त यावा अशी केलेली योजना, सौर चिमणी, एक्झॉस्ट फॅनचा वापर, नैसर्गिक रंगांचा वापर यामुळे तुमचे राहणीमान आरोग्यवर्धक होते.

उत्तम जीवनशैली- इको फ्रेंडली वस्तूंचा वापर घरामध्ये केल्यामुळे तुमची जीवनपद्धती निसर्गाशी एकदम पूरक होते. उदाहरणार्थ ग्रीन होम्समध्ये बांबू, पुनर्वापर केलेले धातूचे सुटे भाग, क्ले प्लॅस्टर, इको फ्रेंडली फर्निचर, बांबूचे फर्निचर, फिक्या रंगाची अंतर्गत सजावट केल्यामुळे एकूण जीवनशैली सुधारते.

Web Title: What is Green Home? If you want to build a new house, think about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.