आतापर्यंत प्रेमाची खूप पुस्तके वाचली असतील, आता प्रेमाचे Psychological Facts वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 04:11 PM2019-05-20T16:11:08+5:302019-05-20T16:16:56+5:30
यात देण्यात आलेले फॅक्ट्स तुम्हालाही विचार करायला भाग पाडतील. कारणे हे फॅक्ट्स कमी आणि आपल्यासोबत घडलेल्या गोष्टी अधिक आहेत.
तसं प्रेमात लॉजिक असं काही नसतं, बस ज्या व्यक्तीवर प्रेम असतं आपलं मन त्या व्यक्तीकडे ओढलं जातं. मग ती व्यक्ती वाईट असो वा चांगली. पण Quora वेबसाइटवरील एका लेखाने हे सांगितलं की, प्रेमात लॉजिक असतं. यात देण्यात आलेले फॅक्ट्स तुम्हालाही विचार करायला भाग पाडतील. कारण या गोष्टी फॅक्ट्स कमी आणि आपल्यासोबत घडलेल्या गोष्टी अधिक आहेत. यातील काहीना काही नक्कीच आपल्यासोबत कधीना कधी घडलेलं आहे.
१) सायकॉलॉजिकल रूपाने बघायचं तर ज्या पुरूषांचं पोट बाहेर आलेलं असतं, त्यांच्याकडे महिला आकर्षित होत नाहीत. कारण फॅटमुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं. यामुळे कामेच्छा आणि प्रजनन क्षमताही कमी होते.
२) स्लिम ट्रिम महिलांकडे पुरूष अधिक आकर्षित होतात. याला 'Sexual Imprinting' म्हणूण ओळखलं जातं.
३) ज्या पुरूषांचा Sense Of Humor चांगला असतो अशांकडे महिला अधिक आकर्षित होतात. कारण चांगला Sense Of Humor ने ते इमानदार असल्याचं दर्शवतात.
४) ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता, त्या व्यक्तीने प्रेमाने जर तुमचा हात हाती घेतला तर वेदना, स्ट्रेस आणि भीती सहजपणे दूर होते.
५) आनंद एक जाणीव आहे. ज्यापासून दूर राहणे कठीण आहे. त्यामुळे जी व्यक्ती खूश आहे त्यावर प्रेम न करणे किंवा त्यापासून दूर जाणे फार कठीण असतं. कारण असे लोक जेव्हा सोबत असतात, तेव्हा वातावरण आनंदी असतं.
६) Psychologically दृष्टीने सांगायचं तर महिलांना असं वाटतं की, पुरूष जेव्हा दुसऱ्या महिलांना बघून स्माइल करतात, तेव्हा ते अधिक आकर्षक वाटतात.
७) ज्या पुरूषांच्या आवाजात जडपणा असतो म्हणजेच Base असतो, ते महिलांना अधिक आकर्षक वाटतं.
८) सायकॉलॉजीनुसार, लोक त्यांच्या Opposite Sex सोबत फार जास्त दिवसांपर्यंत 'Just Friends' राहू शकत नाहीत.
९) प्रेमाची जाणीव प्रत्येक व्यक्तीच्या शरीर आणि मेंदूवर शांत आणि चांगला प्रभाव टाकतो. याने साधारण एका वर्षापर्यंत Nerve चा विकास वेगाने होते.
१०) एखाद्याला पसंत करायला किंवा एखादी व्यक्ती आवडायला केवळ ४ मिनिटांचा कालावधी लागतो. असे मानले जाते की, एखाद्या लक्ष आणि आकर्षण मिळवण्यासाठी Body Language आणि आवाज जास्त काम करतो.
११) प्रेम करणारे दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या डोळ्यात बघतात तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके एकमेकांसोबत जुळू लागतात. असं करायला केवळ ३ मिनिटांचा वेळ लागतो.
१२) न्यूरोलॉजिकनुसार, प्रेमात पडणं आणि कोकीन घेणे दोन्ही समान आहे. ज्याप्रमामे कोकेन घेतल्याने मेंदूमध्ये एक वेगळी एनर्जी येते. तशीच प्रेमात पडल्यावरही शरीरात आणि मेंदूत एक वेगळी एनर्जी येते.
१३) Cuddling एखाद्या पेनकिलर सारखं काम करतं. जेव्हा दोन लोक एकमेकांना आलिंगण देतात तेव्हा त्यांचा मेंदू Oxytocin रिलीज करतो. हे एक कडल हार्मोन आहे. याने डोकेदुखी कमी होण्यात मदत होते आणि वेदना ४ तासांसाठी दूर करण्यासही मदत मिळते.
१४) ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता, त्या व्यक्तीचा फोटो पाहिल्यावर वेदनेतून सुटका मिळते.