लव्ह लाइफ हिट आणि फिट ठेवण्यासाठी १७ जालिम उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 01:15 PM2019-02-27T13:15:13+5:302019-02-27T13:20:01+5:30

प्रेमाबाबत कुणाला काही सल्ला मागितला तर सारी दुनिया सल्ला देण्यासाठी तयार असते. कारण सगळ्यांना असं वाटत असतं की, या विषयात त्यांनी पीएचडी मिळवली आहे.

17 strategies for a better love life | लव्ह लाइफ हिट आणि फिट ठेवण्यासाठी १७ जालिम उपाय!

लव्ह लाइफ हिट आणि फिट ठेवण्यासाठी १७ जालिम उपाय!

Next

प्रेमाबाबत कुणाला काही सल्ला मागितला तर सारी दुनिया सल्ला देण्यासाठी तयार असते. कारण सगळ्यांना असं वाटत असतं की, या विषयात त्यांनी पीएचडी मिळवली आहे. पण कुणाचं ऐकायचं ही तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. पण अमेरिकेतील इलिनॉय यूनिव्हर्सिटीच्या एका प्रोफेसरने याबाबत हिंमत दाखवली आणि रिलेशनशिपशी संबंधित १, १०० स्टडीजवर रिसर्च केला. आणि त्यातील १७ अशा गोष्टी काढल्या ज्यांच्या मदतीने कपल्स त्यांचं नातं आणखी चांगलं ठेवू शकतात. 

५० वर्ष चालला रिसर्च

ब्रायन ओगोलस्की नावाच्या या प्राध्यापकाने त्याच्या आयुष्यातील ५० किंमती वर्ष रिलेशनशिप मॅनेजमेंट या विषयावर खर्ची केले आहेत. ओगोलस्कीने त्याच्या करिअरचा एक मोठा भाग नात्यांमधील सकारात्मक गोष्टीं जाणून घेण्यात घालवला. इतक्या वर्षांच्या रिसर्चनंतर त्याला आढळलं की, ठोबळमानाने अशा १७ रणनिती आहेत, त्यांचा वापर करून कपल केवळ रिलेशनशिप बिघडण्यापासूनच वाचवू शकत नाही तर नातं आणखी घट्ट करू शकतात. 

ब्रेकअपच्या बचावासाठी ३ गोष्टी

आपल्या रिसर्चमध्ये ब्रायन या निष्कर्षावर पोहोचला की, तीन गोष्टींवर काम केल्यावर लोक त्यांचं बिघडलेलं नातं पुन्हा एकदा मजबूत करू शकतो. त्या तीन गोष्टी म्हणजे, आपल्या पार्टनरशिवाय दुसऱ्या पर्यायाचा विचार न करणे, आपल्या पार्टनरला आदर्श पार्टनर मानने आणि आपल्या पार्टनरच्या वागण्यातील सकारात्मक गोष्टींवर फोकस करणे. 

या ५ गोष्टींनी टाळू शकता ब्रेकअप

जेव्हा रिलेशनशिपमध्ये असलेले दोन व्यक्ती किंवा कपल त्यांचं नातं तुटण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करतात, तेव्हा त्यांची स्ट्रटेजी ही एकट्या प्रेमीच्या रणनितीपेक्षा वेगळी असते. या पाच गोष्टींमध्ये अडचणीच्या स्थितीशी दोघांनी सामना करावा, एकमेकांच्या चुका माफ करणे, वैयक्तीक हितापेक्षा रिलेशनशिपला महत्त्व द्या, एकमेकांची मदत करा आणि पर्सनल व प्रोफेशनल तणाव दूर करण्यासाठी दोघे मिळून काम करा. 

रिलेशनशिप सुधारण्यासाठी १ व्यक्ती काय करतो

We talk have a positive impact on relationship than I | नातं मजबूत करण्याचं गुपित

ब्रायनला आढळलं की, रिलेशनशिपमध्ये कोणतीही एक व्यक्ती वयक्तीक रुपाने ४ पद्धतीने संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतो. तो एक टीम म्हणून काम करतो, आपल्या पार्टनरप्रति उदारता दाखवण्याची भावना ठेवतो, त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी काही चांगलं करत असेल तर कृतज्ञतेचा अनुभव करतो आणि तो पार्टनरच्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठी प्रार्थना करतो. 

रिलेशनशिप सुधारण्यासाठी ५ पद्धती

रिसर्चमध्ये ब्रायनला आढळलं की, कपल्स त्यांच्या रिलेशनशिपची क्लालिटी सुधारण्यासाठी पाच पद्धतींवर काम करतात. एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे, दिवसभराच्या धावपळीनंतर गंमत, जोक्सना लाइफचा अंग करणं, एकत्र मजेदार गोष्टी करणं, एकमेकांचं म्हणणं ऐकणं आणि त्यावर प्रतिक्रिया देणे तसेच रिलेशनशिप कसं सुरू आहे यावर संवाद करणं.

Web Title: 17 strategies for a better love life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.