या 4 राशींच्या मुलींना लग्नासाठी कधीही देऊ नका नकार, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 01:50 PM2018-05-14T13:50:33+5:302018-05-14T14:01:44+5:30
अलिकडे हे कमी झालं असलं तरी काही लोक आजही राशी बघतात. त्यानुसार खालील 4 राशींच्या मुली चांगल्या साथीदार होऊ शकतात, असे बोलले जाते. चला जाणून घेऊया त्या 4 राशींच्या मुलींबद्दल....
प्रेमाचं नातं जेव्हा लग्नापर्यंत येऊन पोहोचतं तेव्हा मुलींसोबतच मुलांनाही अनेक प्रश्न पडलेले असतात. काय ते लग्नासाठी तयार आहेत? काय त्यांनी आत्ता लग्न करायला हवं? काय त्यांची गर्लफ्रेन्ड त्यांची पत्नी होऊ शकेल? काय दोघांचा संसार चांगला होईल? आजकाल आजूबाजूला नाती लगेच तुटताना बघितल्याने त्यांच्या मनात असे प्रश्न येणे सहाजिक आहे. खरं तर सुखी संसार हा त्या दोन व्यक्तींच्या वागण्यावर, एकमेकांना समजून घेण्यावर होतो. पण आपल्याकडे लग्नाआधी राशी जुळवून बघण्याची पद्धत आहे. अलिकडे हे कमी झालं असलं तरी काही लोक आजही राशी बघतात. त्यानुसार खालील 4 राशींच्या मुली चांगल्या साथीदार होऊ शकतात, असे बोलले जाते. चला जाणून घेऊया त्या 4 राशींच्या मुलींबद्दल....
1) मेष राशी (Aries)
मेष राशीच्या मुली या अधिक सुंदर, आकर्षक आणि आत्मविश्वासू असतात. त्या समजूतदारपणे नातं निभावतात. त्या कधीही आपल्या साथीदाराला दगा देण्याचा विचार करत नाही, असेही बोलले जाते. कारण त्यांच्यासाठी त्यांचा पार्टनर सर्वात महत्वाचा असतो.
2) वृश्चिक राशी (Scorpio)
वृश्चिक राशीच्या मुलीही समजूतदार आणि नात्यात आपल्या पार्टनरला सपोर्ट करणाऱ्या असतात. आपल्या समस्या दूर ठेवून त्या आपल्या पार्टनरच्या समस्या सोडवण्यात अधिक समोर असतात. त्या पार्टनरच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात. त्या आपल्या पार्टनरला भरपूर प्रेम देतात.
3) मकर राशी (Capricorn)
मकर राशीच्या मुली या प्रत्येक नात्याबाबत इमानदार असतात. तसेच लग्न झाल्यानंतर पार्टनरचा आनंद त्यांच्यासाठी प्राधान्य असतो. त्यानंतर त्या त्यांच्या आणि इतरांच्या आनंदाचा विचार करतात. त्यामुळे या राशीच्या मुली चांगल्या पार्टनर होऊ शकतात असे बोलले जाते.
4) कन्या राशी (Virgo)
कन्या राशीच्या मुली या समजूतदार आणि मनाने निर्मळ असतात. त्या त्यांच्या पार्टनरसोबत मनातलं सगळं शेअर करतात. त्यांचा पारदर्शी नात्यावर जास्त विश्वास असतो. असे असल्यास दोघांमध्ये मतभेद कमी होतात आणि संसार सुखाचा होतो.
(टिप : राशींमुळे संसार सुखाचा होतो असा आमचा दावा नाही.)