या 5 मुख्य कारणांमुळे मुली लग्नासाठी मुलांना करतात रिजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 11:40 AM2018-05-31T11:40:42+5:302018-05-31T12:14:41+5:30
मुलं रिजेक्ट करण्याची वेगवेगळी कारणे देत असतात. पण त्यातील महत्वाची कारणे कोणती हे खालीलप्रमाणे बघता येतील.
लग्नाचं नाव घेताच आता तरुण मुलं-मुली वेगवेगळी कारणे द्यायला लागतात. लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आहे हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे काहींना ही जबाबदारी घेण्याची भीती वाटते. आजकाल मुलांपेक्षा मुलींमध्ये अधिक भीतीचं वातावरण बघायला मिळतं. त्या सहजासहजी लग्नासाठी तयार होताना दिसत नाहीत. आणि मुलं रिजेक्ट करण्याची वेगवेगळी कारणे देत असतात. पण त्यातील महत्वाची कारणे कोणती हे खालीलप्रमाणे बघता येतील.
1) स्वातंत्र्य
आजच्या पिढीला त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल फारच प्रेम असतं. त्यांच्यावर कोणतही विनाकारणचं बंधन असू नये, त्यांचे निर्णय घेण्याचं त्यांना स्वातंत्र्य असायला हवं असतं. पण लग्नानंतर त्यांच्या याच स्वातंत्र्यावर गदा येणार असते असा त्या विचार करतात. त्यामुळे लग्नापासून दूर जाण्यासाठी त्या मुलांना रिजेक्ट करतात.
2) करिअरला महत्त्व
आजकाल मुली आपल्या करिअरला फारच महत्त्व देऊ लागल्या आहेत. त्यांना त्यांची स्वत:ती वेगळी निर्माण करायची असते. स्वत:च्या पायावर त्यांना उभं रहायचं असतं. त्यामुळे अशात लग्न केल्यामुळे त्यांचं करिअरचं हे स्वप्न धुळीला मिळू शकतं असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्या मुलांना रिजेक्ट करतात.
3) मुलाची फॅमिली
काही मुली असा विचार करतात की, लग्नानंतर मुलाच्या परिवाराकडून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या जातील. अशात घर आणि नोकरी कशी सांभाळायची हा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतो. निर्णय घेण्याआधी सर्वांचं मत घ्यावं लागेल हाही विचार त्या करत असतात त्यामुळेही त्या मुलांना रिजेक्ट करता असं निरीक्षण आहे.
4) प्रेमसंबंध
काही मुलींचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम असतं पण हे सगळं तिच्या घरी चालणारं नसतं. त्यामुळे त्या ही गोष्ट घरी सांगू शकत नाही. अशावेळी त्यांना मुलांना रिजेक्ट करण्याशिवाय पर्याय नसतो.
5) आजूबाजूला घडत असलेल्या घटना
सतत आजूबाजूला वैवाहिक समस्या त्यांना बघायला मिळतात. छोट्य़ा छोट्या कारणांमुळे मोडलेले संसारही त्यांनी बघितले असतात. अनेक आधी चांगली वागणारी आणि नंतर वाईट झालेल्या मुलांची उदाहरणे त्यांनी वाचलेली, ऐकलेली असतात. अशात लग्न करायची इच्छा असूनही एक भीती त्यांच्या मनात तयार झालेली असते. त्यामुळेही आपल्या मनाची तयारी होईपर्यंत त्या मुलांना रिजेक्ट करतात.