मित्र-मैत्रिणींच्या या वागण्याला चुकून समजलं जातं प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 02:53 PM2018-05-23T14:53:47+5:302018-05-23T14:55:48+5:30
काही लोक आपल्या भावनांमुळे समोरच्या व्यक्तीच्या मैत्रीलाही प्रेम समजून बसतात. असा गैरसमज होऊ नये म्हणून घ्या काही महत्वपूर्ण गोष्टी...
अनेकदा असं होतं की काही लोक प्रेम आणि मैत्रीत फरक करु शकत नाहीत. आणि मग गैरसमज होतात. गरजेचे नाहीये की जे तुमच्या मनात आहे तेच तुमच्या मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या मनात असेल. मग काही लोक आपल्या भावनांमुळे समोरच्या व्यक्तीच्या मैत्रीलाही प्रेम समजून बसतात. असा गैरसमज होऊ नये म्हणून घ्या काही महत्वपूर्ण गोष्टी...
1) चांगला मित्र / मैत्रिण
शाळेत, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये अनेकदा असे मित्र असतात ज्यांच्यासोबत वेळ घालवणं आवडत असतं. ते तुमच्या गोष्टींना समजून घेतात आणि तुमच्याबद्दल त्यांना सगळं माहीत असतं. अनेकदा ते तुम्हाला खूश करण्याचाही प्रयत्न करतात. पण कुणी तुमच्यासाठी असे करणे म्हणजे प्रेमच असेल असे नाही.
2) लूक्सवर प्रेम
अनेकदा आपल्याला लोकांची कपड्यांची स्टाईल, बोलण्याची स्टाईल, त्यांच्या अदा पसंत असतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. याच आकर्षणाला प्रेमाचं नाव दिलं जातं. पण प्रेम आणि आकर्षण यांच्यातील फरक ओळखा.
3) जेव्हा त्याच्यासोबत वेळ घालवणं आवडतं
जर त्यांच्यासोबत वेळ घालवणं, तासंतास बोलणं आवडत असेल तर याचाही अर्थ ते प्रेम आहे असं नसतं. मित्रांमध्येही ही ओढ असते.
4) स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर या...
लाईफ पार्टनर कसा असावा याबाबत प्रत्येकाने स्वप्ने रंगवलेली असतात. खासकरुन मुली आपल्या पार्टनरबाबत स्वप्ने रंगवत असतात आणि अचानक असं कुणी मिळालं तर त्या त्याला प्रेम समजतात. जर तुम्हाला असं वाटत असेल तर आधी विचार करा.
5) काळजी करणे
तुम्ही आजारी असाल किंवा वैतागलेले असाल आणि अशात कुणाचा तुम्हाला आधार मिळत असेल. एखादी व्यक्ती इतरांपेक्षा तुमची जास्त काळजी घेणार असेल तर त्याला लगेच प्रेम समजू नका. तुमच्या दोघांच्या नात्यामुळे ती तुम्हाला मदत करत असेल तर त्याचा सन्मान करा. नाहीतर तुम्हालाच पश्चाताप होऊ शकतो.