तुमच्या गर्लफ्रेन्डच्या या सवयींमुळे नातं बिघडू शकतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 03:23 PM2018-06-28T15:23:38+5:302018-06-28T15:24:52+5:30
खासकरुन मुली आपल्या बॉयफ्रेन्डबाबत फार जास्त पझेसिव्ह होतात. त्यामुळे मुलांना याचा कंटाळा यायला लागतो. चला जाणून घेऊया मुलींच्या अशाच काही सवयी ज्यामुळे मुलांना त्रास होतो.
बॉयफ्रेन्ड आणि गर्लफ्रेन्डच्या नात्यात अपेक्षा आणि पझेसिव्ह वागणं हे काही काळाने येतंच. जसजसं नातं पुढे जातं तसं पझेसिव्ह होण्याचं प्रमाण काहींमध्ये वाढत जातं. हे पझेसिव्हनेस प्रेमाच्या नात्यासाठी फार चांगलं नसतं. पण कधी कधी दोघेही यावर कंट्रोल करु शकत नाहीत. खासकरुन मुली आपल्या बॉयफ्रेन्डबाबत फार जास्त पझेसिव्ह होतात. त्यामुळे मुलांना याचा कंटाळा यायला लागतो. चला जाणून घेऊया मुलींच्या अशाच काही सवयी ज्यामुळे मुलांना त्रास होतो.
1) धमकवतात
मुद्दा कोणताही असो पण ती जर सतत आवाज चढवून आपलंच बोलणं खरं असल्याचं सांगत असेल तर ती पझेसिव्ह होते आहे. असे करुन ती केवळ धमकवत असल्याचे समजा.
2) संशय घेण्याची सवय
तुमच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणे, कुठे जाताय, कुणाला भेटताय याबाबत सतत विचारत राहणे, अशा काही मुली वागतात. या वागण्यामुळे तुमची पर्सनल स्पेस संपते आणि समोरच्या व्यक्तीच्या दबावामुळे नात्यात विश्वास कमी उरतो. त्यामुळे पुढे जाऊन नात्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
3) सतत तिचं किती प्रेम आहे हे भासवत राहणार
दोघांच्या नात्यात प्रेम आहे हे जर दोघांनाही माहीत असेल तर पुन्हा पुन्हा ते सांगण्याची गरज पडत नाही. पण तुमची गर्लफ्रेन्ड तुमच्याबाबात जास्त पझेसिव्ह आणि अग्रेसिव्ह असेल तर हे नात्यासाठी चांगलं नाहीये.
4) डॉमिनेट करणे
माझी प्रत्येक गोष्ट बरोबर आहे हे सांगणे, तुमच्या सतत चुका दाखवणे, तुम्हाला कमी लेखणे या गोष्टी जर तुमची गर्लफ्रेन्ड करत असेल तर तुमची गर्लफ्रेन्ड पझेसिव्ह झाली आहे. तिला हे नातं केवळ तिच्याच हिशोबाने पुढे घेऊन जायचं आहे. अशावेळी तुमची घुसमट होऊ शकते.
5) दुसऱ्याचं कौतुक सहन न होणे
जर तुम्ही दुसऱ्या एखाद्या मुलीचं कौतुक केलं तर ते सहन होणे म्हणजे ती पझेसिव्ह वागतीये. याप्रकारच्या तिच्या वागण्यामुळे तुमचं नातं वेगळ्या वळणावर जाऊ शकतं.