रिलेशनशीपमधील ५० टक्के महिला आधीच ब्रेकअप पार्टनरची करून ठेवतात सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 03:41 PM2020-01-08T15:41:26+5:302020-01-08T15:51:49+5:30

गर्लफ्रेंन्ड आणि बॉयफ्रेंन्डबद्दल रिलेशनशीपमध्ये असताना भविष्यात काय होईल, आपण सोबत असू की नसू असा असे विचार करत असतात.  

50 percent women have backup partner in relationship says research | रिलेशनशीपमधील ५० टक्के महिला आधीच ब्रेकअप पार्टनरची करून ठेवतात सोय

रिलेशनशीपमधील ५० टक्के महिला आधीच ब्रेकअप पार्टनरची करून ठेवतात सोय

Next

गर्लफ्रेंन्ड आणि बॉयफ्रेंन्डबद्दल रिलेशनशीपमध्ये असताना भविष्यात काय होईल, आपण सोबत असू की नसू असे विचार करत असतात. कारण त्यावेळी तुम्हाला एकमेकांबद्दल खुप प्रेम वाटतं असतं. पण तुम्ही कधी कसा विचार केलाय का मी तिला किंवा त्याला सोडून दिलं तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोण असेल. त्यांच आयुष्य कसं असेल. याच विषयावर आधारीत एक रिसर्च करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये जे स्पष्ट झाले ते ऐकून तुम्हाला  विश्वास बसणार नाही. 

हा रिसर्च परदेशातील महिलांवर करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये जवळपास १ हजार महिलांचा समावेश होता. लग्न झालेल्या आणि लग्न न झालेल्या अशा स्त्रियांचा या रिसर्चमध्ये समावेश होता. हा रिसर्च ऑनलाइन आणि मोबाइल पोलिंग मध्ये  स्पेशलाइज्ड  असलेल्या मार्केटिंग रिसर्च कंपनी वनपोलद्वारे करण्यात आला. 

या रिसर्चंमध्ये जे स्पष्ट झालं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण हे खरं आहे. महिला या पार्टनरसोबत कमिटेड असताना सुद्धा बॅकअप प्लॅन म्हणजेच  दुसरा पार्टनर तयार ठेवतात. कारण जर  पहिल्या पार्टनरसोबत ब्रेकअप झालं तर त्या दुसऱ्या व्यक्तीकडे जातात.  अर्थात असा विचार करण्यामागे महिलांची अनेक कारणं असू शकतात.

या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या ५० टक्के महिलांनी  हे स्वीकारले आहे की जेव्हा त्या रिलेशनशीपमध्ये असतात तेव्हा  नातं जर समजा तुटलं तर स्वतःला एकटं वाटू नये म्हणून दुसरा पार्टनर तयार ठेवतात.  ब्रेकअपनंतर सुध्दा महिला  दुसरा पार्टनर शोधण्यास सुरूवात करतात. कारण जेव्हा त्या रिलेशनशीपमध्ये असतात तेव्हा त्यांच्या पार्टनरकडून खूप दुःख मिळत असतं किंवा सतत भांडण होत असतात. अशावेळी आपला पार्टनर आपल्याला कधीही सोडू शकतो. अशी भावना निर्माण होते.

म्हणून आपल्याला कोणताही मानसीक त्रास होऊ नये किंवा  एकटेपणा येऊ नये म्हणून महिला दुसरा ऑप्शन तयार ठेवतात. काहीवेळा महिला या दुसरा पार्टनर निवडण्यासाठी फारशा उत्सुक नसतात. कारण त्यांना पहिल्या पार्टनरसोबतच राहायचं असतं. पण काही कारणामुळे पार्टनर लांब जाण्याची शक्यता असते अशावेळी महिला त्यांनी विचार केलेल्या सेंकेन्ड ऑप्शनच्या पार्टनरसोबत नातं जुळवण्याचा प्रयत्न करतात. 

लिव्ह इन  रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या महिलांच्या तुलनेत रिलेशनमध्ये असलेल्या महिला तसंच लग्न झालेल्या महिलांचे प्रमाण दुसरा पार्टनर शोधण्यात अधिक होते. कारण  सर्वाधिक केसमध्ये  महिलांचे जुने मित्र जे त्यांच्या भावना समजून घेत असतात. किंवा ऑफिसमधला एखादा व्यक्ती तसंच कॉलेजमधला फ्रेंन्ड यांच्यासोबत  त्या जास्त कनेक्टेड असतात. म्हणून नातं जोडण्याची शक्यता असते. या रिसर्चनुसार १० मधील एक महिला ही रिलेशनशीप मध्ये असताना सुद्धा दुसऱ्या पार्टनरकडे आकर्षीत होते. 

Web Title: 50 percent women have backup partner in relationship says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.