पझेसिव्ह पार्टनरला कसं हॅंडल करायचं याच्या ६ टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 02:26 PM2018-08-01T14:26:38+5:302018-08-01T14:27:07+5:30
कोणत्याही नात्यात थोडं पझेसिव्ह असणं फायद्याचं आणि गरजेचं असतं पण ते अधिक प्रमाणात असू नये. या पझेसिव्हनेसमुळे नातं तुटण्याचीही भीती असते.
पझेसिव्ह हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. कधी गर्लफ्रेन्डबाबत तर कधी बॉयफ्रेन्डबाबत हे बोललं जातं तो किंवा ती फारच पझेसिव्ह आहे. प्रेमाच्या नात्यात काही काळाने पझिसिव्हनेस येतोच. पण याचा दोघांनाही या पझेसिव्ह स्वभावाचा त्रास होत असतो. कोणत्याही नात्यात थोडं पझेसिव्ह असणं फायद्याचं आणि गरजेचं असतं पण ते अधिक प्रमाणात असू नये. या पझेसिव्हनेसमुळे नातं तुटण्याचीही भीती असते. त्यामुळे पझेसिव्ह पार्टनरसोबत कसं वागायचं किंवा डिल करायचं याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) यामागचं कारण जाणून घ्या
प्रत्येक व्यक्तीच्या पझेसिव्ह स्वभावामागे काहीतरी कारण असतं. ते कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बालपणी त्याच्या किंवा तिच्यासोबत काही घडलं असेल म्हणून कदाचित त्यांचा स्वभाव तसा झाला असावा. काहीतरी कारण असेल जे तुम्ही शोधून काढा. जर तुम्हाला ते जाणून घेता नसेल तर प्रोफेशनल काऊंसेलरची मदत घ्या.
२) तुम्हाला या वागण्याने कसं वाटतं त्यांना सांगा
तुमच्या पार्टनरच्या पझेसिव्ह वागण्यामुळे तुम्हाला कसं वाटतं, हे त्यांना सांगा. पण हे सांगण्याची वेळ योग्य निवडा पार्टनरचा मूड कसा आहे हे बघा आणि मग बोला. तुम्हाला त्याच्या किंवा तिच्या अशा वागण्यामुळे काय त्रास होतो हे त्यांना शांतपणे सांगा. पार्टनरला सांगा की, यामुळे तुमच्या नात्यावर काय परिणाम होतो आहे. मोकळेपणाने आणि शांतपणे या विषयावर बोला.
३) तुमच्या खूप प्रेम आणि सगळंकाही ठिक आहे याचा विश्वास द्या
जर पार्टनरचं पझेसिव्हनेस हे कशाबाबत वाटत असलेल्या असुरक्षिततेमुळे असेल तर त्याला त्याबाबत सांगा. पार्टनर याचा विश्वास द्या की, तुमचं त्याच्यावर खूप प्रेम आणि काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. त्याला हेही सांगा की, तुम्ही कधीही त्याचं मन दुखवेल असं काहीही करणार नाही.
४) कम्युमिकेशन महत्वाचं
नात्यामध्ये सगळ्याच गोष्टींबाबत पारदर्शकता असणे फार महत्वाची गोष्ट आहे. खासकरुन पझेसिव्ह वागण्याबाबत डिल करण्यासाठी ही बाब फार महत्वाची आहे. अशात जर तुमच्यात योग्य प्रकारे संवाद होत नसेल तर हा पझेसिव्हनेस वाढण्याची शक्यता असते. तुमच्या भावना शेअर करा, विचार शेअर करा, दिवसभरात काय चांगलं, काय वाईट घडलं हे बोला याने दोघांनाही दिलासा मिळेल.
५) कौतुक करा
तुमचा पती किंवा बॉयफ्रेन्ड किती पझेसिव्ह असला तरी त्याच्यावर चिडण्यापेक्षा त्याने केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करा. याने तुमच्या पार्टनरला असलेली असुरक्षितता दूर होईल. त्याने आधी केलेल्या चुका त्याला सतत दाखवू नका.
६) तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा
पझेसिव्ह व्यक्तीसोबत डिल करणं हे काही सोपं काम नाहीये. अशा व्यक्तीसोबत डिल करताना तुम्ही शांत राहणं फारच गरजेचं असतं. अनेकदा बोलता बोलता तुम्हाला राग येईल पण तुम्हाला रागावर कंट्रोल करावं लागेल. याने परिस्थिती आणखी गंभीर होईल.