लग्नाच्या पाच वर्षांनंतर पती-पत्नीच्या नात्यात होतात हे 7 बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:07 PM2018-05-19T12:07:15+5:302018-05-19T12:07:15+5:30

नवीन लग्न झाल्यावर पती-पत्नी दोघेही आनंदी असतात. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर या नात्यात काही खास बदल बघायला मिळतात. ते काय असतात ते खालीलप्रमाणे पाहुयात.

7 lessons learned from 5 years of marriage | लग्नाच्या पाच वर्षांनंतर पती-पत्नीच्या नात्यात होतात हे 7 बदल

लग्नाच्या पाच वर्षांनंतर पती-पत्नीच्या नात्यात होतात हे 7 बदल

Next

एका वेळेनंतर प्रत्येक नात्यात बदल होत असतात. सगळीच नाती नेहमी एकसारखी राहत नाही. काही बदल चांगले वाटतात तर काही बदल हे नात्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जातात. नवीन लग्न झाल्यावर पती-पत्नी दोघेही आनंदी असतात. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर या नात्यात काही खास बदल बघायला मिळतात. ते काय असतात ते खालीलप्रमाणे पाहुयात.

1) हनीमून 

लग्नानंतरचं पहिलं वर्ष हे हनीमून पिरीयडसारखं असतं. आजूबाजूला सगळंच चांगलं वाटत असतं. पण जसजसे दिवस पुढे जातात, दोघेही हनीमून पिरीयडमधून बाहेर येऊ लागतात. जीवनाकडे वेगळ्या नजरेने ते पहायला लागतात. पण जे लोक या हनीमून मूडमधून बाहेर येत नाहीत, त्यांचं नातं अडचणीत येण्याची अधिक शक्यता असते. 

2) दुसरं वर्ष

लग्नाच्या दुसऱ्या वर्षात पती-पत्नी एकमेकांचे स्वभाव आणि एकमेकांच्या सवयी जाणून असतात. चांगल्या सवयीचं काही नाही, पण वाईट सवयीमुळे खटके उडायला लागतात. त्यामुळे सतत छोटी छोटी भांडणं होऊ लागतात. दुसऱ्या वर्षात आर्थिक आणि मानसिक अडचणी, तसेच फॅमिली प्लॅनिंग याचाही विचार असतो त्यामुळे रोमान्स जरा कमीच होतो. 

3) बोलणं कमी

लग्नाच्या दोन-तीन वर्षांनंतर पती-पत्नी आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतले जातात की, त्यांना एकमेकांसोबत बोलण्याची सवडच मिळत नाही. दोघेही नोकरी करणारे असले की ही समस्या अधिक होते. घर आणि ऑफिसच्या धावपळीत ते आपलं नातं मागे सोडून आले असतात. 

4) भांडणं

ज्या गोष्टी आधी खूप चांगल्या वाटायच्या त्या गोष्टींही काही काळानंतर चिड यायला लागते. मग यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणं होतात. पण दोघांपैकी एकजण समजदार असेल तर भांडण पटकन सोडवलं जाऊ शकतं. पण तसं नसेल तर कठीण आहे. 

5) आधीसारखं प्रेम

लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रेम पूर्णपणे संपतं असं नाहीये. पण ते पूर्वीसारखं राहत नाही, ते कमी होतं. आधीसारख्या रोमॅंटिक डेट्स, सरप्राईज देणं, प्रेमाच्या गोष्टी, अनेक ताससोबत बसणं हे कमी होतं. 

6) संशयाचं भूत

नात्याचा पाया हा विश्वासावर रचला जातो. एकदा विश्वास गमावला तर नातं टिकवून ठेवणं जरा कठीण होऊन बसतं. आणि विश्वास कमी झाल्यावर संशयाचं भूत डोक्यात शिरतं.  

7) नमते घेणे

प्रेम असो वा लग्न भांडण झाल्यावर कुणी एकच सॉरी म्हणतो. एकाने सॉरी म्हटलं की, दोघांमधील वाद संपतो. भांडण मिटतं. त्यामुळे दोघांपैकी असा असतोच जो आपली चुकी नसतानाही भांडण मिटवण्यासाठी सॉरी बोलतो.  

Web Title: 7 lessons learned from 5 years of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.