'हे' ७ संकेत सांगतात त्याची नात्यात होत आहे घुसमट!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 11:39 AM2018-10-30T11:39:37+5:302018-10-30T11:40:32+5:30
जर प्रेम एकतर्फी असेल तर ते यशस्वी होत नाही. असं प्रेम फुलण्याआधीच संपतं. पण नात्यात दोघांपैकी एकाच्याही मनात निराशा आली तर याचा नात्यावर फार वाईट प्रभाव पडतो.
जर प्रेम एकतर्फी असेल तर ते यशस्वी होत नाही. असं प्रेम फुलण्याआधीच संपतं. पण नात्यात दोघांपैकी एकाच्याही मनात निराशा आली तर याचा नात्यावर फार वाईट प्रभाव पडतो. अशात नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर आलं येतं.
अनेकदा असं आढळतं की, महिला पार्टनर किंवा नात्यासंबंधी काही अडचणी असतील तर त्या खुलेपणाने सांगतात. किंवा भांडण करत समोरच्या व्यक्तीवर सगळंकाही वाईट केल्याचा आरोप लावतात. पण असं निरीक्षण आहे की, मुलं पुरुष याबाबत जरा वेगळे असतात. ते लगेच आपल्या मनातील व्यक्त करत नाहीत. पण त्यांचं वागणं सगळंकाही सांगतं.
१) सतत बदलणारा मूड
आनंदी होण्याचं कारण कुणालाही जाणून घ्यायचं नसतं. कारण आनंद हा सर्वांनाच हवा असतो. पण समोरचा दु:खी आहे. निराश आहे, चिडचिड करतोय तर यांचं कारण तुम्हाला शोधायचं असतं. मात्र अनेक प्रयत्न करुनही जर काही कारण सापडत नसेल तर अडचणी आणखी वाढतात. एका मुलगा जेव्हा आपल्या नात्यात हरलेला असतो तेव्हा त्याला कोणत्याही कारणाशिवाय निराशा आणि राग जाणवतो.
२) बोलणं कमी होणे
मुलांना कधीही खूप जास्त बोलणारे किंवा बडबडे मानलं जात नाही. कपलमध्ये बोलणी सुरु करण्याची जबाबदारी ही जास्तकरुन मुलींची असते. पण एकदा जर एखादा मुलगा कुणावर मनापासून प्रेम करायला लागला तर तो त्या व्यक्तीशी खूपकाही बोलतो. पण अचानक त्याचं गुप्प राहणं हा चांगला संकेत नाहीये.
३) चूक मान्य करण्यास नकार
त्यांच्याकडून चुका आधीही होत होत्या आणि आजही होतात. फरक केवळ इतकाच आहे की, आधी तो आपली चूक मान्य करुन परत येत होता आणि माफी मागत होता. पण आता ना तो त्याची चूक मान्य करत आहे, ना परत येऊ माफी मागत आहे.
४) सतत चुका काढणे
स्वत:ची चूक मान्य न करणे हे त्या व्यक्तीचा बिघडलेला मूड दाखवतो. पण जेव्हा ते पूर्णपणे हताश झालेले असतात तेव्हा ते आपल्या पार्टनरमधील चुका मोजायला लागतात. भलेही समोरच्या व्यक्तीची चूक असो वा नसो, त्यांना पार्टनरची प्रत्येक गोष्ट चूक वाटायला लागते.
५) कोणतही प्लॅन नसणे
रिलेशनशिपच्या काही महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर फिरायला जाणे आणि सरप्राइज देणे यांसारखे प्लॅन कमी होणे स्वाभाविक आहे. ही मोठी गोष्ट नाहीये. पण यावर फुल स्टॉप लागणे, ही नकारात्मक गोष्ट आहे. ही फार गंभीर बाब असून यावर बोलणे गरजेचे आहे.
६) तुमची किंमत कमी होणे
एकेकाळी पार्टनरच्या प्रत्येक प्लॅनमध्ये तुम्ही असाल किंवा नसाल तुमचं मत घेतलं जातं होतं. पण आता पार्टनर काय करतोय? कुठे जातोय? कुठून आला? हे तुम्हाला माहीत नाही. आणि याबाबत काही विचारलं तर यावर चिडचिड केली जाते.
७) कारणे देणे
स्वत:हून जवळ न येणे त्याचा कमी होणारा इंटरेस्ट दर्शवतो. पण तुम्ही पुढे जाऊनही जर पार्टनर इंटरेस्ट घेत नसेल तर हा गंभीर संकेत आहे. कधी मूड नसण्याचं कारण देणे तर कधी आजारी असल्याचं कारण देणे. जर या कारणांची संख्या वाढली तर तुम्हाला वेळीच यावर उपाय शोधण्याची गरज आहे.