तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडलात का? असे करा हॅंडल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 12:05 PM2018-04-11T12:05:37+5:302018-04-11T12:05:37+5:30
कधी कधी तर हे आपल्यालाही कळत नाही की, आपण तिच्या/त्याच्यावर प्रेम करू लागलोय. अशात अनेकांना ही स्थिती कशी हाताळायची हेच कळत नाही.
मैत्रीचं नातं सर्वांसाठीच खूप स्पेशल असतं. मात्र, त्याच मित्रावर/मैत्रिणीवर तुमचं मन आलं. तुम्ही जर मित्र किंवा मैत्रिणीच्या प्रेमात पडलात तर सर्वच कॉम्प्लिकेटेड होऊन बसतं. असं अनेकांसोबत होत असेल. अचानक असं काही होतं की, तुम्ही मित्रांवरच प्रेम करू लागता.
कधी कधी तर हे आपल्यालाही कळत नाही की, आपण तिच्या/त्याच्यावर प्रेम करू लागलोय. अशात अनेकांना ही स्थिती कशी हाताळायची हेच कळत नाही. मग गैरसमजामुळे ना मैत्री शिल्लक राहत ना प्रेम….चला तुम्हाला असे काही संकेत आम्ही सांगणार आहोत. ज्या माध्यमातून तुम्ही हे जाणून घेऊ शकाल की तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मनातही तेच सुरू आहे का जे तुमच्या मनात सुरू आहे?
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या मित्रामध्ये किंवा मैत्रिणीमध्येही तुमच्याविषयी तशाच भावना आहेत, तर तिच्या किंवा त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करा. मैत्रीसोडून दुस-या विषयांवर तिच्याशी बोला. हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की, तिच्याही मनात तुमच्याविषयी प्रेम आहे का? कधी सोबत बाहेर फिरायला जा. सोबत जीमला जा. जास्तीत जास्त वेळ सोबत घालवा, असे केल्याने एक वेगळं नातं तयार होतं.
प्रयत्न करा की तुम्ही तिच्या जवळ रहाल. जवळ म्हणजे शारीरिक संबंध असं नाही. तर तिच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या प्रत्येक गोष्टीत होकार मिळवू नका. असे केल्यास कदाचित तुम्ही दूर व्हाल. तिला खूष करण्यासाठी स्वत:ला बदलू नका. तुम्ही आहात तसेच वागा. तसे बोला. जर तुम्ही स्वत:ला बदललं तर तोटा तुमचाच होईल.
तिच्यावर किंवा त्याच्यावर प्रेम थोपवण्यापेक्षा तिच्या/त्याच्या मनात काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. नेहमी हे दाखवू नका की तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता. हे जाणून घ्या की तिच्या मनात खरंच तुमच्याविषही प्रेम आहे का? तसे नाही केले तर तुम्ही तुमचा मित्रही गमवाल आणि प्रेमही…