वयाने मोठ्या असलेल्या मुलींना डेट करण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 03:13 PM2018-04-27T15:13:14+5:302018-04-27T16:16:50+5:30
अनेकांच्या बाबत असं बघायला मिळतं की, एखाद्या मुलाला त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीशी प्रेम होतं. यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होतात.
असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं. प्रेमात जात-धर्म, लहान-मोठे असे काहीही बघितले जात नाही. अनेकांबाबत असं बघायला मिळतं की, एखाद्या मुलाला त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीशी प्रेम होतं. यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होतात. पण असे असण्याचे म्हणजेच वयाने मोठ्या असलेल्या मुलींना डेट करण्याचे अनेक फायदेही आहेत.
1) एका ठरावीक वयानंतर मुलींना साधं राहणं पसंत असतं. अशा मुली त्यांच्या अनुभवावरुन जगणं ब-यापैकी समजलेल्या असतात. तुम्हाला त्या विनाकारण त्रास देण्याची शक्यता कमी असते.
2) अर्थातच वयाने मोठ्या असलेल्या मुलींना अनुभव जास्त असतो. त्यामुळे तुम्ही निराश असाल, टेन्शनमध्ये असाल तर त्यांना माहीत असतं की, तुम्हाला कसं समजवायचं. जर तुमचा त्रास, तुमच्या अडचणी तिला समजत असतील आणि त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत करत असेल तर आणखी काय हवंय.
(तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये हे 7 गुण असतील तर लगेच लग्नाला द्या होकार !)
3) वयाने मोठ्या असलेल्या मुली तुमच्या पर्सनल लाईफची काळजी घेतात. त्या तुमच्या नात्यात तुम्हाला स्वातंत्र्य देतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुमच्या मनात रिस्पेक्ट वाढतो.
4) वाढत्या वयासोबत मनाचा आणि विचारांचाही विकास होतो. मुलींचं धैर्य आणखी वाढलेलं असतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्या भांडत नाहीत. त्या समजूतदारपणा घेतात. हे चांगली गोष्ट आहे कारण अनेकदा रागात चुकीचे निर्णय घेतले जातात.
5) मोठ्या वयाच्या मुली या त्यांच्या करीअरबाबत फार फोकस असतात. त्यांना आयुष्यात काय करायचंय हे माहीत असतं. त्यामुळे विनाकारणच्या गोष्टींना त्या थारा देत नाहीत.
(तुम्हाला तुमच्या क्रशला आकर्षित करायचंय? तर वापरा हे खास फंडे)
6) त्यांना अनुभव अधिक असल्याने त्यांचं कम्युनिकेशन चांगलं असतं. त्या छोट्या छोट्या गोष्टींवर भांडत बसण्यापेक्षा त्यावर बोलून तोडगा काढण्यावर भर देतात.
7) मोठ्या वयाच्या मुलींना हे चांगलंच माहीत असतं की, चांगला पार्टनर मिळणं किती कठीण आहे. अशात जर तुम्ही त्यांना हवे असे असाल आणि त्यांची काळजी घेत असाल तर त्या तुमचीही तितकीच काळजी घेतील.
8) वयाने मोठ्या मुली बहुदा पैशांची बचत करण्यावर भर देतात. त्यामुळे तुमचा पैसा त्यांनी खर्च करण्याचा प्रश्न येत नाही. त्या त्यांचा खर्च उचलू शकतात.