ALERT : सावधान, मुली "या" प्रकारची चाचणी घेऊन सिलेक्ट करतात मुलांना !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 11:45 AM2017-09-22T11:45:37+5:302017-09-22T17:15:37+5:30
मुलांना थोडे सतर्कच राहावे लागेल जेणेकरुन त्यांच्याकडून कोणती चुक होणार नाही. आज आपण जाणून घेऊया की, मुली नेमक्या कोणत्या प्रकारे मुलांची परीक्षा घेतात.
Next
मॉडर्न युगात तरुणाईचे विचार खूपच मॉडर्न होत आहेत. याचेच उदाहरणे आपण बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांद्वारे किंवा प्रत्येक्ष सेलेब्सच्या लाइफद्वारे पाहतोय. या इंडस्ट्रीमध्ये बरेच असे कपल्स आहेत, जे बराच काळ एकमेकांसोबत राहतात, एकमेकांना पारखून घेतात आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतात.
अगोदर काहीही विचार न करता आपण लाइफ पार्टनरची निवड करायचो, मात्र आता मुली तर बऱ्याच प्रकारची पडताळणी करुनच आपला पार्टनर निवडतात. त्याला चांगल्या प्रकारे जज करतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात. अशावेळी मुलांना थोडे सतर्कच राहावे लागेल जेणेकरुन त्यांच्याकडून कोणती चुक होणार नाही. आज आपण जाणून घेऊया की, मुली नेमक्या कोणत्या प्रकारे मुलांची परीक्षा घेतात.
* जर मुलगी एखाद्या मुलाविषयी सीरियस असेल तर तो मुलगी सेविंग किती करतो याची ती नक्कीच चौकशी करेल, कारण तिला तिचे भविष्य सुरक्षित असावे असे वाटते.
* कोणतीही मुलगी आपल्या जोडीदाराची निवड करताना त्याला चांगल्याप्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. यासाठी ती अगोदर त्याच्यासोबत फोनवर गप्पा मारते आणि त्यादरम्यान त्याची परीक्षाही घेते.
* जे मुले महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त स्टाइल आणि कपड्यांवरच लक्ष देतात अशा मुलांना मुली इग्नोर करतात.
* आपला पार्टनर आपल्या भविष्याविषयी काय प्लॅनिंग करतोय, या गोष्टीकडे मुली गांभिर्याने विचार करतात. यासाठी ती कोणत्याही माध्यमाने हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असते.
* मुलगा आपल्या लुकविषयी किती कॉन्शियस आहे, याकडेही मुली आवर्जून लक्ष देतात. आपल्या रिलेशनविषयी तो घरच्यांना तो सांगू शकणार की नाही म्हणजेच मुलामध्ये किती डेयरिंग आहे, याचाही ती सखोल तपास करते.
* मुलगा किती समजदार आणि मॅच्यूअर आहे, हेदेखील ती वेगवेगळ्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आपल्या आयुष्यात येणाºया अडचणीदरम्यान तो किती आणि कसा सपोर्ट करतो, याचीही ती वारंवार पडताळणी करीत असते.
* याव्यतिरिक्त आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रती त्याच्या मनात किती आदर-सन्मान आहे, याचा तपास तर ती वेगवेगळ्या पद्धतीने घेत असते.
एकंदरीत ती जेव्हा ह्या परीक्षा घेत असते, तेव्हा मुलाला याबाबतीत काहीही समजू देत नाही.