​आणि शेवटी गुगलची ‘ड्रायव्हरलेस’ कार दाखल...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 05:01 PM2016-12-14T17:01:32+5:302016-12-14T17:01:32+5:30

अनेक वर्षापासून ज्या कारची उत्सुकता होती, ती म्हणजे गुगलची ड्रायव्हरलेस कार म्हणजेच विनाचालक चालणारी कार पहिल्यांदाच जगासमोर सादर करण्यात आली असून ‘वेमो’ ही कंपनी येत्या कालावधीत या कारचे विविध मॉडेल्स मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे.

And finally, Google's driverless car gets ...! | ​आणि शेवटी गुगलची ‘ड्रायव्हरलेस’ कार दाखल...!

​आणि शेवटी गुगलची ‘ड्रायव्हरलेस’ कार दाखल...!

googlenewsNext
ेक वर्षापासून ज्या कारची उत्सुकता होती, ती म्हणजे गुगलची ड्रायव्हरलेस कार म्हणजेच विनाचालक चालणारी कार पहिल्यांदाच जगासमोर सादर करण्यात आली असून ‘वेमो’ ही कंपनी येत्या कालावधीत या कारचे विविध मॉडेल्स मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. 
गुगल आणि अ‍ॅपलसारख्या दिग्गज टेक्नोसिव्ह कंपन्यांबरोबरच अनेक कार उत्पादक कंपन्यांचे स्वयंचलीत कारवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. मात्र सर्वप्रथम गुगलने आपण वाहकाविना चालविणारी कार विकसित करत असल्याचे जाहीर करून या शर्यतीत आघाडी घेतली होती. २००९ साली गुगलचा हा प्रोजेक्ट सुरू झाला होता. यानंतर या कंपनीच्या वाहकाविना चालणाऱ्या कारच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. गुगलने या चाचण्यांची माहिती जाहीरपणे सादर केली होती. यात नित्यनेमाने अपडेटही करण्यात येत होते. या पार्श्वभूमिवर अलीकडेच गुगल कंपनी स्वयंचलीत कार नव्हे तर यासाठी लागणारी आॅपरेटींग प्रणाली विकसित करत असल्याची अफवा उठली होती. विशेष करून अ‍ॅपल कंपनीच्या कंपूने याला हवा दिली होती. मात्र गुगलने यावर काहीही प्रतिवाद न करता थेट स्वयंचलीत कार जगासमोर सादर करून सर्व अफवांचे खंडन केले.

गुगलच्या स्वयंचलीत कार विभागाचे प्रमुख जॉन क्रॉफ्कीक यांनी सानफ्रान्सिस्को येथील पत्रकार परिषदेत या संदर्भात महत्वाची घोषणा केली. एक तर गुगलचा हा प्रोजेक्ट आता संशोधनात्मक पातळीवरून थेट व्यावसायिक पातळीवर पुढे सरकला आहे. गुगलने आपल्या या प्रोजेक्टला ‘वेमो’ म्हणजेच ‘न्यू वे फॉरवर्ड इन मोबॅलिटी’ या नव्या कंपनीत परिवर्तीत केले असून जॉन क्रॉफ्कीक याचे सीईओ आहेत. आता आगामी काळात ‘वेमो’ कंपनी स्वयंचलीत कार जागतिक बाजारपेठेत लॉंच करणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. आगामी काळात कोणते मॉडेल्स सादर करण्यात येतील याबाबत माहिती देण्यात आली नसली तरी यासाठी गुगल अन्य आॅटोमोबाईल कंपन्यांशी करार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

गुगलने आपल्या स्वयंचलीत वाहनांबाबत अगदी विस्ताराने माहिती जगासमोर सादर केलेली नाही. मात्र आजवर प्राप्त माहितीनुसार यातील काही मॉडेल्समध्ये सुकाणू आणि क्लच व गिअर्स असतील तर काहींमध्ये याला देण्यात आलेले नसेल. काही मॉडेल्समध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर तर काहींमध्ये मागी दोन सीटमध्ये या कारला नियंत्रीत करण्यासाठी बटने देण्यात आलेली असतील. यात आपत्कालीन स्थितीत थांबविण्यासह नेमका कोणत्या मार्गावरून प्रवास करायचा आहे? याच्या नियंत्रणाचा समावेश असणार आहे. अर्थात सर्व मॉडेल्समध्ये अत्यंत उच्च दर्जाचे सेन्सर्स आणि नेव्हीगेशन प्रणाली असेल.

आगामी काळात कोणते मॉडेल्स सादर करण्यात येतील याबाबत माहिती देण्यात आली नसली तरी यासाठी गुगल अन्य आॅटोमोबाईल कंपन्यांशी करार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रसंगी क्रॉफ्कीक यांनी एका व्हिडीओद्वारे आपण अमेरिकेत कुठे कुठे चाचण्या घेतल्या याची माहितीदेखील दिली. गुगलने गेल्या सुमारे आठ वर्षात अब्जावधी डॉलर्स खर्च करून वाहकाविना चालणारी कार विकसित केली असून आजवर सुमारे २० लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत हे विशेष. गेल्या वर्षी स्टीव्ह महन या अंध व्यक्तीने यातून अगदी गजबजलेल्या रस्त्यावरून प्रवास केला होता तेव्हाच या प्रोजेक्टच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब झाले होते. आता गुगलने याला अधिकृतपणे जाहीर करून दुजोरा दिला आहे.

Web Title: And finally, Google's driverless car gets ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.