'या' ७ प्रकारच्या व्यक्तींना डेट करत असाल तर वेळीच व्हा सावध, नंतर होईल पश्चाताप...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 04:09 PM2019-11-13T16:09:22+5:302019-11-13T16:09:47+5:30

अनेकदा एखाद्या नात्याची सुरूवात ही केवळ आकर्षणामुळे होते. पुढे ते या आकर्षणाला प्रेम समजून संसारही थाटतात.

Be careful if you are dating these 7 types of people | 'या' ७ प्रकारच्या व्यक्तींना डेट करत असाल तर वेळीच व्हा सावध, नंतर होईल पश्चाताप...

'या' ७ प्रकारच्या व्यक्तींना डेट करत असाल तर वेळीच व्हा सावध, नंतर होईल पश्चाताप...

Next

(Image Credit : eharmony.co.uk)

अनेकदा एखाद्या नात्याची सुरूवात ही केवळ आकर्षणामुळे होते. पुढे ते या आकर्षणाला प्रेम समजून संसारही थाटतात. पण पुढे अशा काही गोष्टी घडतात की, दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधून भांडणं होतात. ही भांडणं, वाद टाळायचे असतील तर लग्नाआधीच एकमेकांना चांगलं जाणून घेणं महत्वाचं ठरतं. जर तुम्ही एखाद्या मुलाला डेट करत असाल तर त्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला कळेलच असं नाही. त्यामुळे तुम्ही डेट करत असलेल्या व्यक्तीच्या खालील 7 सवयींकडे नक्की लक्ष द्या...यात फायदा तुमचाच...

१) संकुचित विचाराचा

(Image Credit : wikihow.com)

जी व्यक्ती तुमच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. ती व्यक्ती कायम तुमच्यावर या ना त्या कारणाने बंधनं लादत असतात. सतत तुमच्यावर संशय घेत असतात, तर या नात्याबाबत तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. ती व्यक्ती तुमच्यासोबत किती एकनिष्ठ आहे हे तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. खरंतर अशा व्यक्तीमुळे तुम्हाला सुख मिळण्याऐवजी त्रासच जास्त होण्याची शक्यता अधिक असू शकते. 

2) मनमानी करणारा/करणारी

(Image Credit : drprem.com)

काही लोकं अशी असतात जी सतत 'मेरीच गीनो' अशा अविर्भावात वागत असतात. दोघांनी मिळून तयार झालेलं हे नातं तो त्याच्याच नियमांनी हाकत असतो. अशावेळी  दोघांपैकी एकाची कुचंबना होण्याची जास्त शक्यता असते. प्रत्येक नात्यांत काही बेसिक अलिखित नियम असतात. हे नियम पाळले गेले नाही तर भांडणं वाढतात. 

3) स्त्रियांचा आदर

(Image Credit : monkknows.com)

जी व्यक्ती स्त्रियांचा आदर करत नसेल तर मग काय बोलायचं? तुमच्या आयुष्यातील व्यक्ती जर तुमचा आदरच करत नसेल आणि तुम्हाला सतत दुय्यम लेखत असेल तर त्या नात्याला काय अर्थ? कोणत्याही नात्यात ऐकमेकांचां आदर करणं महत्वाचं असतं.

 4) विचार आणि भावनांचा आदर

कोणत्याही नात्यात तुमचे विचार आणि भावना जपणंही तितकंच महत्वाचं आहे. जर हे होत नसेल तर त्याला खरंच प्रेम म्हणता येईल का? असा प्रश्न उभा ठाकतो. जर तुमच्या विचारांचा आणि भावनांचा आदर होत असेल, तरच तुम्ही योग्य व्यक्तीसोबत आहात असे समजा.

5) सतत विनाकारण भांडणारी व्यक्ती

(Image Credit : stellar.ie)

प्रेमाच्या नात्यात भांडणातही एक गोडवा असतो. पण ते भांडण फार काळ असू नये. भांडण हा प्रेमाचाच एक भाग आहे. पण काही व्यक्ती विनाकारण उगाच काहीतरी कारण शोधून सतत भांडत असतात. काही कारण असल्यावर भांडण केल्यास एकवेळ ठिक. पण उगाच भांडण केल्याने तुमचा मनस्ताप अधिक वाढण्याची शक्यता आहे.

6) खोटं बोलून फसवणारी व्यक्ती

(Image Credit : glamour.com)

ते म्हणतात ना की, एखादं खोटं बोलल्याने कुणाचं नुकसान होत नसेल तर ते खोटं एकवेळ चालून जातं. पण एखादी व्यक्ती सतत खोट्याचा आधार घेऊन तुमची फसवणूक करत असेल तर हे अडचणीचं ठरु शकतं. एक खोटं बोलायला दुसरं खोटं आणि दुसरं खोट बोलायला तिसरं. अशावेळी नात्यामध्ये फक्त दुरावा निर्माण होतो. जर ती व्यक्ती नातं तोडण्यासाठी हेच कारण असेल तर खरचं याचा विचार करा.

7) खाजगी स्पेस 

(Image Credit : divorcedgirlsmiling.com)

प्रत्येक नात्यात दोघांनीही एकमेकांना खाजगी स्पेस देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला खाजगी आयुष्य आहे. याचं भान ठेवून स्वतंत्र आयुष्य जगण्यास मदत करणं गरजेचं आहे. पण ते होत नसेल तर विचार करावा.


Web Title: Be careful if you are dating these 7 types of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.